Dybbuk Review : भटक्या आत्म्याशी इमरान आणि निकिताचा लढा, ‘Dybbuk’ चित्रपट पाहण्याचा विचार करताय तर नक्की वाचा!

नवीन नोकरी मिळाल्यानंतर सॅम (इमरान हाश्मी) पत्नी माही (निकिता दत्ता)सोबत मुंबईहून मॉरिशसला जातो. गर्भपात झाल्यानंतर, माही तिचा नवीन परदेश प्रवास सुरू करण्याची तयारी करते. मात्र, त्याच्या या नव्या सुरुवातीमध्ये अनेक मोठ्या अडचणी येतात.

Dybbuk Review : भटक्या आत्म्याशी इमरान आणि निकिताचा लढा, ‘Dybbuk’ चित्रपट पाहण्याचा विचार करताय तर नक्की वाचा!
Dybbuk
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 12:12 PM

चित्रपट : Dybbuk

स्टार कास्ट : इमरान हाश्मी, निकिता दत्ता, मानव कौल

दिग्दर्शक : जय के

काय आहे कथा?

नवीन नोकरी मिळाल्यानंतर सॅम (इमरान हाश्मी) पत्नी माही (निकिता दत्ता)सोबत मुंबईहून मॉरिशसला जातो. गर्भपात झाल्यानंतर, माही तिचा नवीन परदेश प्रवास सुरू करण्याची तयारी करते. मात्र, त्याच्या या नव्या सुरुवातीमध्ये अनेक मोठ्या अडचणी येतात.

कसा आहे चित्रपट?

नव्या घराला नवा लूक देण्यासाठी माही खरेदीला जाते. त्याच वेळी, एका दुकानात, तिला तेथे एक प्राचीन बॉक्स दिसतो, जो पाहून ती खूप आकर्षित होते. ती तो उघडते आणि चुकून एका आत्म्याला मुक्त करते. बॉक्स एक डिबुक आहे. डिबुक हा एक विस्कळीत मानवी आत्मा आहे, जो स्थायिक होण्यासाठी शरीर शोधत नाही तोपर्यंत भटकत राहतो.

प्राचीन अवशेष, पडकी घरे किंवा इतर कोणाच्या तरी वैयक्तिक वस्तू यांसारख्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण उत्सुक असतात. परंतु, एखाद्याच्या आयुष्यात प्रवेश केल्याने आपण त्याच्या भूतकाळाशी संबंधित गोष्टींशी जोडले जातो.

जेकेने डेब्यू चित्रपटाचा बनवला रिमेक

दिग्दर्शक जय के यांनी त्यांच्या पहिल्या मल्याळम चित्रपट ‘एज्रा’चा हिंदी रिमेक बनवला आहे. चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये महिलांना ओब्जेक्टीव्ह केले गेलेले नाही. चित्रपटात फारसे बोल्ड सीन्स नाहीत. कथेची प्रगती सहज आणि जलद आहे. अचानक भितीदायक दृश्ये कमी आहेत. चित्रपट चांगला व्हावा यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले आहेत. इमरान हाश्मी, निकिता दत्ता आणि चित्रपटातील इतर सर्व सहकलाकारांनीही चांगला अभिनय केला आहे.

चित्रपटात दिसलेली थोडीशी कमतरता म्हणजे कथेच्या प्रत्येक टप्प्यावर रहस्य दाखवण्यात दिग्दर्शक थोडासा अपयशी ठरला आहे, असे वाटते. अशावेळी तुम्हाला जास्त भीती वाटणार नाही. स्पेशल इफेक्ट ठीक आहेत. एखाद्या वाईट आत्म्याला पाठीमागून समोर आणणे ठीक आहे, पण तो भय निर्माण करू शकतो का हा प्रश्न आहे.

का पहाल चित्रपट?

जर तुम्हाला हॉरर चित्रपट आवडत असतील आणि बर्‍याच दिवसांनी इमरानचा हॉरर चित्रपट पहायचा असेल, तर तुम्ही हा चित्रपट एकदा पाहू शकता.

चित्रपट पाहण्याआधी विचार करावा का?

चित्रपट पाहण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा असे वाटू शकत. कारण चित्रपटात फारशी भयपट दृश्ये नाहीत, तर तुम्हाला या चित्रपटात भयपटाची उणीव जाणवू शकते. त्यामुळे जर तुम्हाला हलकीफुलकी हॉरर फिल्म बघायची नसेल, तर तुम्हाला हा चित्रपट फार रुचणार नाही.

हेही वाचा :

Mannat | ‘किंग खान’च्या लेकाची तुरुंगातून सुटका, ‘मन्नत’ बाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांचा महापूर!

RIP Yusuf Husain | अभिनेता युसूफ हुसैन यांचे निधन, हंसल मेहता यांनी शेअर केली भावनिक पोस्ट!

Hum Do Hamare Do Review : परेश रावल-रत्ना पाठक जोडीशी राजकुमार-क्रितीची तगडी टक्कर, प्रेक्षकांना मिळणार विनोदाची मेजवानी!

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.