Aranyak Review | कमबॅक सीरीजमध्ये रवीना टंडनची जादू गायब? ‘अरण्यक’ प्रेक्षकांच्या पचनी पडेना!
गुगलवर ‘अरण्यक’चा (Aranyak) अर्थ शोधला असता, लक्षात येते की असा कोणताच शब्द नाही. योग्य शब्द ‘आरण्यक’ असा आहे. ‘आरण्यक’ हा हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथ वेदांचा भाग आहे. ‘आरण्यक’ म्हणजे जो अरण्य म्हणजेच जंगलाशी संबंधित आहे. आता असचं काहीसं ‘अरण्यक’ या नावाच्या सीरीजसोबत झालं आहे.
मुंबई : गुगलवर ‘अरण्यक’चा (Aranyak) अर्थ शोधला असता, लक्षात येते की असा कोणताच शब्द नाही. योग्य शब्द ‘आरण्यक’ असा आहे. ‘आरण्यक’ हा हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथ वेदांचा भाग आहे. ‘आरण्यक’ म्हणजे जो अरण्य म्हणजेच जंगलाशी संबंधित आहे. आता असचं काहीसं ‘अरण्यक’ या नावाच्या सीरीजसोबत झालं आहे.
परदेशी व्यासपीठाला प्रेक्षक हवा असतो, पण त्याला भाषिक विचारांची अजिबात पर्वा नसते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुठेतरी चांगल्या विचारांचा अभाव दिसत असून, एकमेकांवर कुरघोड्या सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मची एक बाजू अशीही आहे की, त्यांनी घरी बसलेल्या नायक-नायिकांचं भलं केलं आणि त्यांना काम मिळू लागली.
काय आहे कथानक?
अभिनेत्री रवीना टंडन हिने ‘अरण्यक’मधून ओटीटी पदार्पण केले. पण, तिने प्रेक्षकांना निराश केले आहे. संपूर्ण कथेत, ती सिरोना नावाच्या काल्पनिक पोलिस स्टेशनची मुख्य अधिकारी बनते, जिचे नाव कस्तुरी डोग्रा आहे. ती वर्षभराची सुट्टी घेणार असते. कस्तुरीच्या जागी अंगद मलिक (परमब्रत चक्रवर्ती) एन्ट्री करतो. त्यानंतर या परिसरात एका परदेशी तरुणीची हत्या होते. तिचा मृतदेह जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडतो आणि हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध होते.
अचानक 19 वर्षांनंतर नर-बिबट्या परतल्याची चर्चा परिसरात आहे. तो पूर्वी असेच काम करत होता. मुलींवर बलात्कार आणि हत्या हे सत्र आधीही सुरु होते. नर-बिबट्या हे मिथक आहे. सुमारे 40 ते 45 मिनिटांच्या आठ एपिसोडमध्ये ‘अरण्यक’ दोनच प्रश्नांची उत्तरे शोधते. पहिली म्हणजे परदेशी तरुणीची हत्या कोणी आणि का केली? दुसरी, नर-बिबट्याचे वास्तव काय आहे?
एपिसोडमध्ये अनेक चुका!
अरण्यक मधील गडबड पहिल्या भागापासूनच दिसून येते. वातावरण डोंगराळ आहे आणि त्यातील पात्रांच्या बोलीभाषेला हरियाणवी टच आहे. दुसरीकडे, कस्तुरी गॅसवर अन्न शिजवत असून तिची मुलगी लाकूड घेऊन परत येईल, असे सांगून घराबाहेर पडते. कस्तुरी सांगते की, तिचे सासरे, माजी पोलीस अधिकारी महादेव डोगरा (आशुतोष राणा) यांच्याशी तिचे गुरु-शिष्याचे नाते आहे, परंतु या नात्याची ताकद कोणत्याही दृश्यात दिसत नाही.
अशा अनेक त्रुटी आहेत, जे दर्शवतात की निर्माते रमेश सिप्पी-सिद्धार्थ रॉय कपूर आणि नेटफ्लिक्सच्या टीमने यावर योग्य संशोधन केले नाही. कथा जबरदस्तीने पुढे खेचली आहे. एकामागून एक अशी अनेक पात्रे येतात, जी आपल्याच विश्वात अडकलेली दिसतात. ‘अरण्यक’ची सर्व पात्रे मुद्दाम रचल्या सारखी वाटतात. त्यांचे एकमेकांशी असलेले कनेक्शन देखील सहजासहजी दिसत नाही.
कमकुवत कथानक
कथेतील सर्व पात्रांना लेखकांनी कृत्रिम प्रयत्नांनी जोडले आहे. राजकारणी बनलेले झाकीर हुसेन आणि मेघना मलिक यांच्यातील शत्रुत्व असो किंवा कस्तुरी आणि अंगद यांच्यातील आममा-सामना असोत, प्रत्येक वेळी घटना मुद्दाम रचल्या गेल्याचे दिसते.
या मालिकेत ड्रग्ज आणि सेक्सची चर्चा सतत चर्चेत येते आणि नर-बिबट्याचे मिथक खोटे ठरणार आहे, हे प्रेक्षकांना कथा सुरू होताच समजते. प्रत्येक पात्रावर बलात्कार आणि खुनाचा संशय घेण्याची युक्ती वापरत कथा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. पण, तिला योग्य फ्लो नाही. एखादे पात्र संशयाच्या भोवऱ्यात येते आणि नंतर निर्दोष सुटते. त्यानंतर दुसऱ्याची वेळ येते. अशा प्रकारे कथेवरची पकड हळूहळू सैल होत जाते. अरण्यकचा क्लायमॅक्स खूपच निराशाजनक आहे.
अभिनयही सुमारच!
रवीना टंडनपासून ते कोणत्याही इतर अभिनेत्यापर्यंत, कोणीही इथे विशेष प्रभावी वाटत नाही. पोलीस अधिकारी असूनही रवीना तिच्या लिपस्टिककडे जास्त लक्ष देते. परमब्रत चक्रवर्ती एक चांगला अभिनेता आहे पण इथे त्याच्या वाट्याला विशेष काही आले नाही. तसेच, आशुतोष राणा, झाकीर हुसेन आणि मेघना मलिक या कलाकारांची प्रतिभा या मालिकेत दिग्दर्शकाने वाया घालवली आहे. हे सगळे कथेच्या उपऱ्यासारखे दिसतात. त्यांना प्रत्येकी एक ट्रॅक देऊन दिग्दर्शकाने काढता पाय घेतला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व पात्रांच्या चेहऱ्यावर एकच भाव दिसतो. त्यामुळे ही सीरीज काही प्रेक्षकांच्या पचनी पडलेली नाही.
हेही वाचा :
Happy Birthday Kimi Katkar | ‘जुम्मा चुम्मा’ गर्ल किमी काटकर, मनोरंजन विश्वात आल्यावर बदलले नाव!