अर्पिता खानच्या ईद पार्टीत धोनीच्या लेकीचीच चर्चा; साक्षीसोबत झिवाचा व्हिडीओ व्हायरल

साक्षी आणि महेंद्र सिंह धोनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करायचे. या व्हिडीओंमधील झिवाचा क्युटनेस सर्वांनाच खूप आवडायचा. त्यानंतर आता बऱ्याच काळानंतर झिवाला माध्यमांसमोर पाहिलं गेलंय.

अर्पिता खानच्या ईद पार्टीत धोनीच्या लेकीचीच चर्चा; साक्षीसोबत झिवाचा व्हिडीओ व्हायरल
साक्षी धोनी, झिवाImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 11:02 AM

मुंबई : शनिवारी देशभरात धूमधडाक्यात ईद साजरी करण्यात आली. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही ईदचा उत्साह पहायला मिळाला. ईदच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी शानदार पार्ट्यांचं आयोजन करतात. सलमान खानची बहीण अर्पिता खानसुद्धा दरवर्षी ईदच्या पार्टीचं आयोजन करते. या पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी उपस्थित असतात. यंदा बॉलिवूडसोबतच क्रीडाविश्वातील नामांकित सेलिब्रिटीसुद्धा या पार्टीला हजर होते. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी आणि तिची मुलगी झिवाने या पार्टीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

अर्पिता खानच्या ईद पार्टीतील साक्षी धोनी आणि झिवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या पार्टीतील मायलेकीचा लूक नेटकऱ्यांना खूपच आवडला. साक्षीने क्रीम रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर झिवासुद्धा निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. धोनीची मुलगी झिवा इतकी मोठी कधी झाली, हाच प्रश्न नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून पडला आहे.

हे सुद्धा वाचा

साक्षी आणि महेंद्र सिंह धोनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करायचे. या व्हिडीओंमधील झिवाचा क्युटनेस सर्वांनाच खूप आवडायचा. त्यानंतर आता बऱ्याच काळानंतर झिवाला माध्यमांसमोर पाहिलं गेलंय. म्हणून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे.

साक्षीने चेन्नई सुपर किंग्सच्या एका लाईव्हमध्ये सांगितलं होतं की, माही आणि तिची भेट एका पार्टीत झाली होती. धोनी ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलमध्ये साक्षी इंटर्न म्हणून काम करत होती. त्यानंतर धोनी आणि साक्षी यांच्यातील मैत्री वाढत गेली. काही काळ एकमेंकाना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. ऑस्ट्रेलियामध्ये 2015 सालच्या विश्वचषकाची तयारी भारती संघ करत होता. त्याचवेळी साक्षीने झिवाला जन्म दिला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.