मुग्धा वैशंपायनचं सासरी गृहप्रवेश, प्रथमेश उखाणा घेत म्हणाला, ‘माझी गरीब गाय…’

prathamesh laghate - mugdha vaishampayan : प्रथमेश उखाणा घेत मुग्धाला म्हणाला, 'माझी गरीब गाय...', तर, मुग्धा सासू - सासऱ्यांचं नाव घेत म्हणाली..., मुग्धा वैशंपायन हिच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...

मुग्धा वैशंपायनचं सासरी गृहप्रवेश, प्रथमेश उखाणा घेत म्हणाला, 'माझी गरीब गाय...'
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 11:52 AM

मुंबई | 30 डिसेंबर 2023 : ‘लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर झालेली प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांची पहिली ओळख आता लग्नापर्यंत पोहोचली आहे. 21 डिसेंबर रोजी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचं लग्न झालं. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता मुग्धा हिच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गृहप्रवेश करताना प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी उखाणा देखील घेतला आहे.

मोठ्या थाटात आणि उत्साहात मुग्धा हिचा सासरी स्वागत करण्यात आले. मुग्धा हिच्या स्वागतासाठी सासरच्या मंडळींनी पूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुग्धा हिच्या गृहप्रवेशाची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, गृहप्रवेश करताना प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी घेतलेले उखाणे देखील चाहत्यांना प्रचंड आवडले आहे…

हे सुद्धा वाचा

गृहप्रवेशावेळी उखाणा घेताना प्रथमेश म्हणाला, “कपात ओतला चहा, चहाखाली ठेवली बशी….कपात ओतला चहा, चहाखाली ठेवली बशी…. मुग्धा माझी गरीब गाय बाकी सगळ्या मारक्या म्हशी…” प्रथमेश याने उखाणा घेतल्यानंतर पाहुणे पोट धरुन हसू लागले…

प्रथमेशनंतर मुग्धा उखाणा घेतल म्हणाली, “मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर अन् माहेरची खूण प्रथमेशचं नाव घेऊन कलाश्रीमध्ये प्रवेश करते नीना आणि उमेश लघाटे यांची सून!” चाहत्यांना देखील मुग्धा हिने घेतलेला उखाणा प्रचंड आवडला आहे. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी सोशल मीडियावर व्हिडओ पोस्ट केला आहे. तर व्हिडीओला ‘वेड’ सिनेमातील “सुख कळले…” हे गाणं लावलं आहे.

व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. सांगायचं झालं तर, जेव्हा प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सोशल मीडियाच्या माध्यमातून नात्याची कबुली दिली, तेव्हा पासून दोघे चर्चेत आहेत.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.