वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ बबीताच्या अंगलट, केव्हाही अटक होण्याची शक्यता

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह इतर राज्यांनीही वादग्रस्त व्हिडिओवर कारवाई केली.

वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणं 'तारक मेहता का उल्टा चश्मा' बबीताच्या अंगलट, केव्हाही अटक होण्याची शक्यता
मुनमुन दत्ता
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 1:56 PM

मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फ्रेम अभिनेत्री बबीता (babita) म्हणजे मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिने युट्युबला (youtube) एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये तिने एका समुदायाला उद्देशून वक्तव्य केलं असल्याची तक्रार दाखल झाली आहे. तसेच तिने या प्रकरणी त्या समुदायाची अनेकदा माफी सुध्दा मागितली असल्याचे समजतंय. तिच्या प्रकरणाने एक वेगळं घेतलं असून तिला कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डिएनएच्या वृत्तानुसार मुनमुनच्या वकीलांनी अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती, परंतु न्यायाधीशांनी याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मुनमुन दत्ताला केव्हाही अटक होण्याची शक्यता वकीलांनी व्यक्त केली आहे. वारंवार माफी मागूनही अटक होणार असल्याने मुनमुन यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनेक चाहत्यांनी मुनमुनला आधार दर्शविला आहे.

या कारणामुळे अटक

युट्यूबला मुनमुन दत्ताने एक व्हिडीओ नुकताच अपलोड केला होता. त्यामध्ये तिने एका समाजाला उद्देशून कमेंट केली असल्याचे तक्रार दाखलेल्यांचे म्हणणे आहे. हे मुनमुनला समजताच तिने अनेकवेळा समाजाची माफी सुध्दा मागितली आहे. तरीही त्यांनी तक्रार मागे घेतलेली नाही. अटक होऊ नये यासाठी मुनमुन दत्ता यांनी या वकिलांमार्फत न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायाधिशांनी त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

नेमकं काय म्हणाली मुनमुन

व्हायरल झालेला व्हिडीओ 2021 चा आहे, त्यामध्ये तिने ‘मैं यूट्यूब पर आ रही हूं, और मैं अच्छा दिखना चाहती हूं, भंगी की तरह नहीं दिखना चाहती.’ असं वक्तव्य केलं होतं. ज्यावेळी त्या समाजाला हे वक्तव्य केल्याची माहिती मिळाली. त्यांनी मुनमुन विरोधात तक्रार दाखल केली असल्याचं समजतंय. व्हीडीओ अपलोड झाल्यानंतर काहीवेळातचं तिच्यावर अनेकांनी कमेंटकरून माफी मागायला सांगितली आहे. #ArrestMunmunDutta असं ट्रेडिंग सुध्दा नेटक-यांनी चालवलं होतं.

मुनमुन दत्ताची माफी

केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांची माफीही मागितली होती. “हे मी काल पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या संदर्भात आहे, ज्यामध्ये माझ्याद्वारे वापरलेल्या एका शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. अपमान, धमकावणे, अपमानित करणे किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याच्या हेतूने हे मी कधीही केलेले नाही. माझ्या भाषेच्या अडथळ्यामुळे, मला या शब्दाच्या अर्थाबद्दल खरोखर चुकीची माहिती मिळाली होती. त्याचा अर्थ मला कळला की लगेच तो भाग काढून टाकण्यात आला आहे. मला प्रत्येक जात, धर्म किंवा लिंगातील प्रत्येक व्यक्तीबद्दल अत्यंत आदर आहे आणि त्यांनी आपल्या समाजात किंवा राष्ट्रासाठी दिलेल्या अतुलनीय योगदान सुध्दा माहित आहे. या शब्दाच्या वापरामुळे नकळतपणे दुखावलेल्या प्रत्येक व्यक्तीची मनापासून माफी मागते.”

इतक्या राज्यांमध्ये तक्रार

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह इतर राज्यांनीही वादग्रस्त व्हिडिओवर कारवाई केली.

राखी सावंतचं विनर रुबिकाला ओपन चॅलेंज, सलमान म्हणाला, जास्त कॉन्फिडन्स दाखवू नको, पुढे मंचावर १ मिनिट धिंगाणा!

काजोल कोरोना पॉझिटिव्ह, मुलगी न्यासाचं गोड हास्य; प्रियंका चोप्राकडून न्यासाचं कौतुक

एका तपानंतर संजय दत्त आणि सुनील शेट्टी करणार एकत्र काम, ‘नो प्रॉब्लेम’नंतर आता लवकरच नव्या सिनेमात एकत्र दिसणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.