‘औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय…’, लेखकाच्या वक्तव्यानंतर मुस्लिम धर्मगुरूंकडून प्रत्युत्तर
‘औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय…’, लेखकाच्या वक्तव्यानंतर मुस्लिम धर्मगुरूंकडून संताप, प्रत्युत्तर देत म्हणाले, 'केवळ मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीच...', मुघल शासक औरंगजेबाबाबतचा वाद दिवसागणिक आणखीनच चिघळत आहे.

देशात मुघल शासक औरंगजेबाबाबतचा वाद दिवसागणिक आणखीनच चिघळत चालला आहे. हे वाद आता राजकारणी व्यक्तींपासून लेखल आणि मौलानांपर्यंत पोहोचले आहेत. नुकताच प्रसिद्ध लेखक मुंतशिर याने औरंगजेबाबाद्दल मोठं वक्तव्य केलं. आता त्याच्या वक्तव्यावर मुस्लिम धर्मगुरूंनीही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज मुंतशीर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुस्लिम धर्मगुरू मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी म्हणाले, ‘मनोज मुंतशीर हे पूर्ण मानसिक दिवाळखोरीचे बळी आहेत.’
शहाबुद्दीन रिझवी बरेलवी म्हणाले, ‘मनोज मुंतशिर यांना सुशिक्षित समजलं जातं. एक साक्षर व्यक्ती इतकं वाचाळ वक्तव्य कशी करू शकते. केवळ मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीच असं वाईट विधान करू शकते. मनोज मुनताशीर हे लेखक नसून ते मनाने दिवाळखोर आहेत… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मनोज याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाला मनोज मुंतशिर?
भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध लेखक, मनोज मुंतशिर हे अनेकदा आपले विचार खुलेपणाने मांडण्यासाठी ओळखले जातात. आपले मत मांडण्यात तो कधीही मागेपुढे पाहत नाही. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या वक्तव्याची कायम चर्चा रंगलेली असते. ज्यामुळे त्यांना वादग्रस्त परिस्थितीचीा सामना करावा लागतो. दरम्यान, सध्या महाराष्ट्रात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर वाद सुरु आहे. वाद सुरु असताना प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर याने मोठं वक्तव्य केलं.




मनोज मुंतशिर म्हणाले, ‘महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी… यावरून अनेक वाद होत आहे. औरंगजेबाची कबर तोडावी अशी अनेकांची मागणी आहे… मला असा बिलकूल वाटत नाही. पण ती कबर काढून टाकावी? जेव्हा आपण हिंदू रामजन्मभूमीवर श्री रामाचं मंदिर बांधत होतो, तेव्हा काही लोक आपल्याला ज्ञान देत होते की देव प्रत्येक कणात आहे, मग मंदिर बांधण्याची काय गरज आहे वगैरे! त्या जागेवर शाळा, रुग्णालय बांधा… असं अनेक जण म्हणाले.
‘औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची गरज नाहीये, तर त्यावर शौचालय बांधा… अशी माझी मागणी आहे. आपण सनातनी आहोत. आपण त्या खुन्याला किमान किमान युरिया आणि मीठ दान करू शकतो. आणि जे म्हणतात नाही भारत कोण्च्या बापाचा नीही . तर मला सांगायला आवडेल की, ‘हिंदूस्थान आमचे राणा, छत्रपती शिवाजी महाराज.. आमच्या बापाचा होता आणि राहिल..’ असं देखील मनोज म्हणाला सध्या लेखकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.