‘ती खूप ड्रामेबाज आहे…” नागा चैतन्य पत्नी शोभिताच्या या सवयीवर नाराज
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्से शेअर केले आहेत. नागा चैतन्यने शोभितेच्या काही विचित्र सवयींबद्दल सांगितले आहे. तसेच त्याने शोभिताला ड्रामेबाज म्हटलं आहे.

लग्नाच्या 3 महिन्यांनंतर शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य सोशल मीडियावर आता हळू हळू सक्रिय होत आहेत. तसेच मुलाखतींनाही जात आहेत. अलिकडेच दोघेही युरोप ट्रिपवर होते. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत नागा चैतन्यने पत्नी शोभिताच्या काही सवयींवर आक्षेप घेतला आहे.
एकमेकांच्या सवयींबद्दल खुलासे
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत एकमेकांच्या सवयींबद्दल खुलासे केले आहेत. त्यांना विचारण्यात आलेला पहिला प्रश्न होता की दोघांपैकी सर्वात आधी माफी कोण मागतं? त्यावर शोभिता म्हणाली की ती स्वतः आधी माफी मागते. शोभिताला थांबवत नागा चैतन्यने उत्तर दिलं की शोभिता सॉरी आणि थँक्सवर विश्वासच ठेवत नाही. असं म्हणत त्याने तिची खिल्ली उडवली आहे.
त्यानंतर विचारण्यात आलं की दोघांपैकी कोण चांगलं स्वयंपाक करतं आणि त्याचा आवडता पदार्थ कोणता? तेव्हा नागा चैतन्य म्हणाला की त्यांच्यापैकी कोणीही स्वयंपाक करत नाही. तेव्हा शोभिता म्हणाली की नागा तिला दररोज रात्री हॉट चॉकलेट बनवून देतो. त्यावर नागा चैतन्यने लगेच म्हटलं की “हे स्वयंपाक नाहीये. हॉट चॉकलेट, कॉफी, हे सर्व स्वयंपाक नाहीये”
दोघांपैकी जास्त रोमँटिक कोण?
जेव्हा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाला विचारण्यात आलं की दोघांपैकी कोण जास्त रोमँटिक आहे, तेव्हा दोघांनीही सांगितलं की नागा चैतन्य जास्त रोमँटिक आहे तर शोभिता प्रेरणादायी आणि मजेदार गोष्टी बोलते. नागाने असेही सांगितले की शोभिताला गाडी चालवता येत नाही. शोभिता म्हणाली, “मी गाडी चालवत नाही. मी फक्त लोकांना गाडी चालवायला वेडं करते.”
View this post on Instagram
चित्रपटांबद्दल विचारले असता, नागा चैतन्य म्हणाला की शोभिताला चित्रपट पाहण्याची गरज आहे. जेव्हा शोभिता म्हणाली की ती त्याच्याच चित्रपटांपासून सुरुवात करेल, तेव्हा चैतन्यने हसत नाही म्हणत तिला दुसरे कोणतेही चित्रपट पाहण्यास सांगितले.
नागा चैतन्य शोभिताला ड्रामेबाज का म्हणाला?
आजारी असताना कोण जास्त नाटक करत असं विचारताच दोघांनीही एकमेकांची नावे घेतली. शोभिता म्हणाली की ती जास्त आजारी पडते पण नागा जास्त नाटक करतो. यावर नागा चैतन्यने प्रतिक्रिया देत म्हटलं “जेव्हा तु आजारी असता तेव्हा तु थेट बेशुद्ध पडते” तेव्हा शोभिता म्हणाली की ती खरोखर आजारी असल्याने बेशुद्ध पडते आणि ते नक्कीच नाटक नसतं. वादविवाद जिंकण्यात कोण पुढे असतं त्यावेळी शोभिताने चैतन्यचे नाव घेत म्हटलं की तो खरोखर जिंकतो.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचे लग्न गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये झाले. शोभितापूर्वी नागा चैतन्यचे लग्न समंथाशी झाले होते. 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले.