AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समंथाशी घटस्फोटानंतर किती जणींना किस केलंस? नाग चैतन्यच्या उत्तराची जोरदार चर्चा

समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं जातंय. काही दिवसांपूर्वी या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये चैतन्य हा एका रेस्टॉरंटमधल्या शेफसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसला.

समंथाशी घटस्फोटानंतर किती जणींना किस केलंस? नाग चैतन्यच्या उत्तराची जोरदार चर्चा
Naga Chaitanya and SamanthaImage Credit source: Instagram
| Updated on: May 03, 2023 | 10:23 AM
Share

हैदराबाद : अभिनेते नागार्जुन यांचा मुलगा आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्वाश्रमीचा पती नाग चैतन्य सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने घटस्फोट जाहीर केला. त्यानंतर नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं गेलं. सोभिताने मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाग चैतन्य त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. ‘तू आजपर्यंत किती जणींना किस केलंस’, असा प्रश्न नाग चैतन्यला विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे.

किसिंगबद्दल प्रश्न विचारताच नाग चैतन्य हसला आणि म्हणाला, “मला माहीत नाही. मी मोजणं सोडून दिलं. म्हणजे चित्रपटात बरेच किसिंग सीन्स असतात. तर मग मी कसा मोजू शकतो? प्रेक्षकांना आधीच माहीत आहे. त्यात काहीच सिक्रेट नाही.” हा व्हिडीओ व्हायरल झाला तर मी अडचणीत नक्कीच सापडेन, असंही तो पुढे मस्करीत म्हणतो.

याच मुलाखतीत नाग चैतन्यला त्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठा पश्चात्ताप कोणता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना नाग चैतन्य म्हणाला की त्याला त्याच्या आयुष्यातील कोणत्याच निर्णयाबद्दल किंवा गोष्टीबद्दल पश्चात्ताप नाही. फक्त त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, असं त्याने सांगितलं. चित्रपटांच्या निवडीविषयी तो पुढे म्हणाला, “कदाचित मी चित्रपटांच्या निवडीबद्दल योग्य निर्णय घेतला नाही. असे दोन-तीन चित्रपट आहेत, जे निवडताना मी नीट विचार केला नाही. मात्र तीसुद्धा माझ्यासाठी एक शिकवणच होती.”

‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय नाग चैतन्य?

समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं जातंय. काही दिवसांपूर्वी या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये चैतन्य हा एका रेस्टॉरंटमधल्या शेफसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसला. तर त्याच्या मागील टेबलवर सोभिता बसलेली पहायला मिळाली.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.