AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने अनुषा शेट्टीशी बांधली लग्नगाठ; बेंगळुरूत पार पडला विवाहसोहळा

Naga Shaurya: लोकप्रिय अभिनेत्याने अनुषा शेट्टीशी केलं लग्न; पहा Video

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने अनुषा शेट्टीशी बांधली लग्नगाठ; बेंगळुरूत पार पडला विवाहसोहळा
Naga Shaurya weddingImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2022 | 10:42 AM
Share

बेंगळुरू: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नाग शौर्य याने प्रेयसी अनुषा शेट्टीशी लग्नगाठ बांधली. रविवारी बेंगळुरूमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. नाग शौर्यने इन्स्टाग्रामवर लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. तर लग्नसोहळ्यातील काही व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

बेंगळुरूमधल्या एका हॉटेलमध्ये शौर्य आणि अनुषाच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात शौर्यने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर अनुष्काने फ्लोरल लेहंग्याची निवड केली होती. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींसाठी आणि सहकाऱ्यांसाठी हैदराबादमध्ये नाग शौर्य रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याचं कळतंय. नाग शौर्यची पत्नी अनुषा ही इंटेरिअर डिझायनर आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Naga Shaurya (@actorshaurya)

शौर्यने 2011 मध्ये ‘क्रिकेट, गर्ल्स अँड बीअर’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘चंदामामा कथलू’मध्येही त्याने भूमिका साकारली आहे. ‘ओ बेबी’ या चित्रपटात त्याने समंथा रुथ प्रभूसोबत स्क्रीन शेअर केला होता. नाग शौर्य लवकरच ‘रंगबली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी तो शर्ली सेठियासोबत ‘कृष्णा वृंदा विहारी’ या चित्रपटात झळकला होता.

लग्नाच्या तीन दिवस आधी नाग शौर्य त्याच्या आगामी ‘एन एस 24’ या चित्रपटाचं शूटिंग करताना बेशुद्ध पडला होता. चित्रपटातील ॲक्शन सीनदरम्यान परफेक्ट बॉडी दिसण्यासाठी तो नो वॉटर डाएट करत होता, अशीही माहिती होती. म्हणजेच तो कोणत्याही प्रकारचे द्रव्य पदार्थांचं सेवन करत नव्हता. नॉन-लिक्विड डाएट आणि सिक्स-पॅक ॲब्ससाठी तासनतास जिममध्ये व्यायाम केल्याने त्याची तब्येत बिघडली होती.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.