‘या’ अभिनेत्याकडे पैशांची खाण; प्रायव्हेट जेट, 1 हजार जमीन केली दान; संपत्तीचा आकडा थक्क करणारा

अनेक मर्गांनी अभिनेता कमावतो कोट्यवधी रुपयांची माया; भव्य घर, महागड्या गाड्यांचं कलेक्शन, प्रायव्हेट जेट आणि बरंच काही... अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा

'या' अभिनेत्याकडे पैशांची खाण; प्रायव्हेट जेट, 1 हजार  जमीन केली दान; संपत्तीचा आकडा थक्क करणारा
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 3:34 PM

मुंबई | 23 जुलै 2023 : फक्त बॉलिवूडच्याच प्रसिद्ध अभिनेत्यांकडे नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांकडे देखील गडगंज संपत्ती आहे. ज्यामुळे सेलिब्रिटी एक रॉयल आयुष्य जगतात. आता सध्या ज्या अभिनेत्याच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे तो अभिनेता बॉलिवूडमध्ये देखील प्रचंड चर्चेत असतो. एवढंच नाही तर, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला अभिनेत्याने १० वर्ष डेट देखील केलं आहे. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता नागार्जुन आहे. अभिनेत्याने नुकताच ‘बिग बॉस’ तेलुगूचं होस्ट करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे. नागार्जुन सिनेमे, मालिका, जाहिराती आणि इतर अनेक मार्गांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.

नागार्जुन गडगंज श्रीमंत आहे, पण अभिनेता तिचकाच दयाळू देखील आहे. अभिनेता एक दोन नाही तर तब्बल १ हजार एकर जमीन पार्कसाठी दिली आहे. तर अभिनेत्याची एकून संपत्ती तब्बल ९०० कोटी रुपये आहे. नागार्जुन याचं हैदराबाद याठिकाणी भव्य घर आहे. घरात सर्व सुविधा आहेत. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अभिनेता कायम हैदराबाद येथील भव्य घरी जात असतो.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या भव्य घराची किंमत जवळपास ४२ कोटी रुपये आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ४२ कोटी रुपयांच्या घरात फक्त चार लोकं राहतात. नागार्जुन याची आई, पत्नी आणि मुलं… ४ हजार क्षेत्रफळात अभिनेत्याचं घर पसरलं आहे. अभिनेत्याचं घर अत्यंत महाग वस्तूंनी सजवण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

भव्य घरासोबत अभिनेत्याकडे स्वतः प्रायव्हेट जेट आणि महागड्या गाड्या आहेत. २०१८ मध्ये अभिनेत्याने स्वतःच्या प्रायव्हेट जेटचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शिवाय अभिनेत्याकडे बीएमडब्ल्यू, पोर्श यांसारख्या महागड्या गाड्या देखील आहेत. एवढंच नाही तर, त्याच्याकडे एकापेक्षा एक बाईक्सचं कलेक्शन देखील आहे.

नागार्जुन फक्त अभिनेता नसून उद्योजक देखील आहे. नागार्जुन याचे वडिलांनी अन्नपूर्ण स्टोडीओ या नावाने एक प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं होतं. हैदराबाद येथील एका पॉश परिसरात २२ एकर जागेत हे प्रॉडक्शन हाऊस तयार करण्यात आलं आहे.

नागार्जुन याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे रिपोर्टनुसार तब्बल ९०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. एका सिनेमासाठी नागार्जुन जवळपास १२ ते २० कोटी रुपये मानधन घेतो. अभिनेता त्याच्या संपत्ती आणि अभिनेत्री तब्बू हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे कायम चर्चेत असतो.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.