Love Story असावी तर शिवाजी साटम यांच्यासारखी; संसारात पत्नीने साथ सोडली पण ACP Pradyuman यांनी…

Love Story | अभिनेते शिवाजी साटम यांची डोळ्यात पाणी आणणारी 'लव्हस्टोरी...', पत्नीने साथ सोडल्यानंतर 'या' व्यक्तींनी दिला अभिनेते शिवाजी साटम यांना आधार... शिवाजी साटम यांच्या प्रेमाचा प्रवास थक्क करणारा

Love Story असावी तर शिवाजी साटम यांच्यासारखी; संसारात पत्नीने साथ सोडली पण ACP Pradyuman यांनी…
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 1:47 PM

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : खऱ्या प्रेमाची एन्ट्री प्रत्येकाच्या आयुष्यात होते. काही जणांच्या आयुष्यात लग्नाआधी प्रेमाची एन्ट्री होते. तर काहींच्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर पत्नीवर असलेलं प्रेम बहरतं. अभिनेते शिवाजी साटम यांच्या आयुष्यात देखील असंच काही झालं. शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचं अरेंज मॅरेज होतं, पण दोघांना पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की, त्यांचे अरेंज मॅरेज आहे. शिवाजी साटम यांच्या वडिलांच्या इच्छेने शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचं लग्न झालं. पण शिवाजी साटम यांच्या आयुष्यभर पत्नीची साथ मिळाली नाही. फक्त २४ वर्ष सुखी संसार केल्यानंतर अरुणा साटम यांचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर शिवाजी साटम पूर्णपणे खचलं होतं.

पत्नीने साथ सोडल्यानंतर शिवाजी साटम याच्या आयुष्यातील खास व्यक्तींनी त्यांना आधार दिला. खुद्द शिवाजी साटम यांनी पत्नीच्या निधनानंतर आलेल्या परिस्थितीबद्दल सांगितलं आहे. अरुणा साटम यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यांच्यावर तब्बल सात वर्ष उपचार सुरु होते. शिवाजी साटम म्हणाले, ‘कठीण परिस्थिती आल्यानंतर आपल्यामध्ये नकळत हिंमत येते. ती वेळ अत्यंत कठीण होती. मुलं मोठी होत होती.. त्यांच्यावर उत्तम संस्कार देखील करायचे होते.’

कठीण प्रसंगी साथ दिलेल्या व्यक्तींबद्दल शिवाजी साटम म्हणाले, ‘मी ‘गुलाम-ए-मुस्तफा’ सिनेमाचं शुटिंग करत होतो, तेव्हा माझ्या पत्नीचं निधन झालं. अशा परिस्थितीत अभिनेते नाना पाटेकर, अरूणा इराणी यांनी माझी साथ दिली. ते माझं कुटुंब नव्हते, पण कुटुंबापेक्षा कमी देखील नव्हते… तीन महिने त्यांनी मला सांभाळून घेतलं…’ आजही शिवाजी साटम पत्नीच्या आठवणींमध्ये जगत आहेत.

शिवाजी साटम यांचं कुटुंब

शिवाजी साटम यांचे वडील जिमनॅस्ट होते. शिवाय ते कुस्ती देखील खेळायचे. त्यांची बहीण ऍथलिट होती. तर शिवाजी साटम यांच्या पत्नी महाराष्ट्र कब्बडी टीमच्या कॅप्टन होत्या. त्यांना छत्रपती शिवाजी पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं. शिवाजी साटम यांनी देखील अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अनेक भूमिका साकारल्यानंतर ‘सीआयडी’ या मालिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर शिवाजी साटम यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आजही शिवाजी साटम यांचा ‘दया… कुछ तो गडबड हैं..’ हा डायलॉग चाहते विसरू शकलेले नाहीत. शिवाजी साटम कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.

शिवाजी साटम यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘नायक’, ‘वास्तव’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘चायना गेट’, ‘यशवंत’, ‘जिस देश में गंगा रेहता हैं’ ‘सूर्यवंशम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. १९९८ साली शिवाजी साटम यांनी ‘सीआयडी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, शिवाजी साटम यांनी अनेक सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केलं आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.