नाना पाटेकर 20 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात होते तेव्हा…, ब्रेकअपनंतर म्हणाले, ‘तिला पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी…’

Nana Patekar on breakup: ज्याने ब्रेकअपचं दुःख सोसलं आहे. त्यालाच या भावना कळतील…, स्वतःपेक्षा 20 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात होते नाना पाटेकर... ब्रेकअपबद्दल केलं होतं मोठं वक्तव्य

नाना पाटेकर 20 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात होते तेव्हा..., ब्रेकअपनंतर म्हणाले, 'तिला पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी…'
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 3:39 PM

‘क्रांतीवीर’, ‘नटसम्राट’, ‘परिंदा’, ‘वजूद’, ‘टॅक्सी नं. 9 2 11’, ‘वेलकम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही नाना पाटेकर कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीसोबत नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मनिषा कोईराला आहे. 1996 साली प्रदर्शित झालेल्या ‘अग्निसाक्षी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान नाना पाटेकर आणि मनिषा यांच्यामध्ये प्रेम बहरलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

मनिषा, नाना पाटेकर यांच्यापेक्षा जवळपास 20 वर्ष लहान होती. पण तेव्हा नाना पाटेकर विवाहित होते. असं असताना देखील नाना पाटेकर, मनिषा हिच्या प्रेमात पडले. पण नाना पाटेकर, मनिषासाठी पत्नीला घटस्फोट देण्यास तयार नव्हते. असं देखील सांगण्यात येत.

मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला. मीडिया रिपोर्टनुसार, मनिषा कोईराला हिने नाना पाटेकर यांना अभिनेत्री आयेशा जुल्का हिच्यासोबत बंद खोलीत पाहिलं होतं.

नाना पाटेकर आणि आयेशा जुल्का यांना एकत्र पाहिल्यानंतर अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यासोबत असलेलं नातं संपवलं. मनिषा हिच्यासोबच ब्रेकअप झाल्यानंतर नाना पाटेकर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. जे आजही चर्चेत आहे. मनिषा फार संवेदनशील अभिनेत्री आहे… असं नाना पाटेकर म्हणाले होते.

एका मुलखतीत नाना म्हणाले होते, ‘तिच्याकडे जे काही आहे, ते गरजेपेक्षा अधिक आहे. ती आता सध्या स्वतःसोबत काय करत आहे… हे पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी येतं… तिच्याबद्दल बोलण्यासाठी आज माझ्याकडे काहीही नाही…’

‘ब्रेकअप आयुष्यातील फार कठीण टप्पा आहे. ब्रेकअपचा सामना करणं फार कठीण आहे. ज्याने ब्रेकअपचं दुःख सोसलं आहे. त्यालाच या भावना कळतील…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले होते. नाना पाटेकर यांच्या शिवाय अनेक सेलिब्रिटींना मनिषा हिने डेट केलं आहे आहे. पण कोणासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. मनिषा आजही खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...