AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर नताशाची पहिली सोशल मीडिया पोस्ट, पांड्या कुटुंबातील व्यक्तीला म्हणाली…

Hardik Pandya And Natasha Stankovic Divorce: घटस्फोटानंतर नताशाची पांड्या कुटुंबातील खास व्यक्तीबद्दल पोस्ट, फोटो शेअर करत व्यक्त केल्या मनातील भावना, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

घटस्फोटानंतर नताशाची पहिली सोशल मीडिया पोस्ट, पांड्या कुटुंबातील व्यक्तीला म्हणाली...
| Updated on: Jul 19, 2024 | 2:51 PM
Share

Hardik Pandya And Natasha Stankovic Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा स्टेनिकोविक सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या 4 वर्षांनंतर हार्दिक – नताशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नताशा – हार्दिक यांनी पुन्हा एकत्र येण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. हार्दिक यांच्यासोबत घटस्फोट झाला असला तरी, नताशा पांड्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करते. सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट करत नताशा हिने पांड्या कुटुंबातील एका व्यक्तीवर प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे.

सांगायचं झालं तर, नताशा हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या याच्या मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. कृणालच्या मुलाचा फोटो पोस्ट करत नताशा हिने चिमुकल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा कव्वूली बवूली… देवाची सदैव तुझ्यावर कृपा राहो… लव्ह…’ असं कॅप्शन दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

नताशा – हार्दिक यांचा घटस्फोट…

गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. ‘4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि नताशाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. नातं टिकवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले आणि आम्हाला विश्वास आहे की, हा निर्णय आमच्या दोघांसाठी योग्य आहे.’ असं दोघांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by @natasastankovic__

मुलासाठी देखील नताशा – हार्दिक यांना भावना व्यक्त केल्या. अगस्त्य आमच्यासाठी आशीर्वाद आहे. तो कायम आमच्या केंद्रस्थानी असेल. त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही.. याची आम्ही दोघं पालक म्हणून काळजी घेऊ…’

नताशा – हार्दिक यांचं नातं…

नताशा – हार्दिक यांची पहिली ओळख नाईट क्लबमध्ये झाली. पहिल्या नजरेतच हार्दिक – नताशा एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 2020 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. 31 मे 2020 मध्ये दोघांनी कोर्टमॅरिज केलं. लग्नाच्या 2 महिन्यांनंतर दोघांनी मुलाचं जगात स्वगत केलं. त्यानंतर 2023 मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीत दोघांनी लग्न केलं.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.