गायक राहुल देशपांडेंचा रोमँटिक अंदाज; ‘अमलताश’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद

अमलताश, बहावा हा वर्षातून एकदाच फुलतो, आपलं जीवन समृद्ध करतो आणि आनंदी निरोप देतो. गायक राहुल देशपांडेंच्या आगामी 'अमलताश' या चित्रपटाला दमदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.

गायक राहुल देशपांडेंचा रोमँटिक अंदाज; 'अमलताश'ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद
AmaltashImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 10:36 AM

मुंबई : 16 फेब्रुवारी 2024 | जीवनाच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण दाखवणाऱ्या ‘अमलताश’ या चित्रपटाचा रंजक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट असेल. चित्रपटाची कथा ही संगीतातूनच पुढे जाताना दिसतेय. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यात एक परदेशी मुलगी आल्याचं दिसतंय, जिला संगीताची आवड आहे. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचं ‘त्या’ कॅनेडिअन मुलीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. राहुल देशपांडे या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुहास देसले म्हणाले, ”अनेकदा चित्रपटाचं वेब सीरिजमध्ये रूपांतर होतं. मात्र इथे उलटं झालं आहे. व्हिडीओ ब्लॉग म्हणून सुरु झालेला हा आमचा प्रवास पडद्यावर चित्रपट रूपात झळकणार आहे. राहुलनेच हे सर्व सुरू केलंय आणि त्यामुळे आपोआपच ते संगीतमय चित्रपटरूपात प्रकट झालं. आम्ही निवडलेले सगळे कलाकार हे मुळात संगीतकार आहेत आणि चित्रपटात वापरलेली सर्व गाणीही सेटवर थेट रेकॉर्ड केली आहेत. आपण आपल्या प्रामाणिक भावना संगीतातून व्यक्त करू शकतो, त्यामुळे शक्य होईल तितकं संगीत व्यक्त करणं, हा चित्रपटामागचा विचार होता.”

हे सुद्धा वाचा

“आमच्याकडे चित्रपटाची कथा नव्हतीच. आम्ही संगीत आणि पात्रांच्या जीवनावर यात भाष्य केलं आहे आणि हाच चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचा वाटेल कारण यातील पात्र तुम्हाला आपल्यातीलच भासतील. एखाद्या प्रियजनासारखी ही पात्रं तुमच्याशी बोलतील. आमचं चित्रीकरण हे पुण्यात झालं आहे. खूप तरल विचार करून पुणे न्याहाळलं तर पुणे शहर हे एखाद्या कवितेसारखेच भासेल. अमलताश, बहावा, वर्षातून एकदाच फुलतो, आपलं जीवन समृद्ध करतो आणि आनंदी निरोप देतो, आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रत्येकासाठी असेल”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे. ‘अमलताश’ हा चित्रपट येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.