AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Awards | राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याचा आनंद.. पहा सेलिब्रिटींची खास क्षणचित्रे

69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण मंगळवारी नवी दिल्लीत पार पडलं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अल्लू अर्जुन, पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, क्रिती सनॉन, आलिया भट्ट यांनी पुरस्कार स्वीकारला. पहा या पुरस्कार सोहळ्याची काही खास क्षणचित्रे...

| Updated on: Oct 18, 2023 | 8:13 AM
Share
मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये झालेल्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांनी पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कलाकारांनी सोशल मीडियावर खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 7
अभिनेत्री आलिया भट्टला 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात तिने नेसलेल्या साडीचीही विशेष चर्चा झाली. आलियाने तिच्या लग्नातील साडी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना नेसली होती.

2 / 7
आलियाने तिच्या लग्नात जी पांढरी साडी नेसली होती, तिच साडी तिने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात नेसली. आलियासाठी हा क्षण अत्यंत खास होता. म्हणूनच ही खास साडी तिने नेसली होती.

3 / 7
मिमी या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री क्रिती सनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आलियासोबत विभागून मिळाला. क्रितीच्या कामगिरीवर आईवडिलांना वाटत असलेला अभिमान या फोटोत स्पष्ट पहायला मिळत आहे.

4 / 7
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित मिमी या चित्रपटात क्रितीने सरोगेट आईची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. यामध्ये तिच्यासोबत काम केलेल्या पंकज त्रिपाठी यांनासुद्धा सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

5 / 7
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनलाही 'पुष्पा : द राईज' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा तो पहिला दाक्षिणात्य अभिनेता ठरला आहे.

6 / 7
पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर जाण्याआधी आलियाने आधी मंचाला स्पर्श करत वंदन केलं आणि त्यानंतर ती पुढे गेली. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते जेव्हा तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या रणबीर कपूरने आपल्या मोबाइल फोनमध्ये तिचा व्हिडीओ शूट केला.

7 / 7
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.