National Film Awards 2023: झुकेगा नहीं… ब्लॉकबस्टर सिनेमा ‘पुष्पा’साठी अल्लू अर्जुन याला राष्ट्रीय पुरस्कार

National Film Awards 2023: अभिनेता अल्लू अर्जुन याला 'पुष्पा'साठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अल्लू अर्जुन याला पुरस्कार मिळाल्यामुळे चाहते आणि कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर देखील सध्या फक्त राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची चर्चा सुरु आहे.

National Film Awards 2023: झुकेगा नहीं… ब्लॉकबस्टर सिनेमा 'पुष्पा'साठी अल्लू अर्जुन याला राष्ट्रीय पुरस्कार
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 7:22 PM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : अभिनेता अल्लू अर्जुन स्टार ‘पुष्पा’ सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर, चहात्यांच्या मनावर देखील राज्य केलं. सिनेमातील डायलॉग सिनेमातील गाणी चहात्यांनी अगदी डोक्यावर उचलून घेतली. ‘पुष्पा’ सिनेमासाठी अभिनेता अल्लू अर्जुन याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. ‘पुष्पा’ सिनेमासाठी अल्लू अर्जुन याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अभिनेत्या राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाला आजही चाहते विसरु शकलेले नाहीत.

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान भवन, दिल्ली येथे करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांना पुरस्कार देवून सन्मानित केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता अल्लू अर्जुन… सांगायचं झालं तर, 24 ऑगस्ट रोजी विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली.

अभिनेता अल्लू अर्जुन याला पुरस्कार मिळाल्यामुळे चाहते आणि कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अनेकांनी अभिनेत्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. अल्लू अर्जन याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहेत. म्हणून सध्या सर्वत्र अभिनेत्याचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

अभिनेत्याने जिंकलं चाहत्याचं मन

अल्लू अर्जुन याने पुष्पा सिनेमात दमदार अभिनय करत चाहत्यांचं मनावर राज्य केलं आहे. सिनेमातील पुष्पाची स्टाईल, पुष्पाचे डायलॉग प्रत्येक गोष्टीला चाहत्यांकडून प्रेम मिळालं. म्हणून अभिनेत्या कामाची पोचपावती देण्यासाठी अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन याला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर, अभिनेत्री आलिया भट्ट हिला ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन हिला ‘मिमी’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे.

अभिनेता अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्मा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं होतं. सिनेमात अल्लू अर्जुन याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत झळकली होती. संपूर्ण जगभरात सिनेमाने जवळपास 365 कोटी रुपयांच्यावर मजल मारली. आता चाहते ‘पुष्पा २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘पुष्पा २’ सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.