Marathi News Entertainment Nawazuddin Siddiqui defends his lip lock with Avneet Kaur in Tiku Weds Sheru says Young generation is nalli
‘यंग जनरेशन नल्ली है’; अवनीत कौरसोबतच्या लिप-लॉक सीनवर हे काय बोलून गेला नवाजुद्दीन सिद्दिकी?
या चित्रपटात शेरू (नवाजुद्दीन) हा स्ट्रगलिंग अभिनेता मुंबईत करिअर करण्यासाठी संघर्ष करत असतो. त्याचे कुटुंबीय त्याच्या लग्नासाठी जी मुलगी (टिकू) शोधतात आणि तिलासुद्धा अभिनेत्री व्हायचं असतं.
Nawazuddin Siddiqui defends his lip lock with Avneet Kaur Image Credit source: Youtube
Follow us
स्वाती वेमूल |
Updated on: Jun 20, 2023 | 10:27 AM
मुंबई : आगामी ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अवनीत कौर यांच्या लिपलॉक सीनवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. 49 वर्षांचा नवाजुद्दीन आणि 21 वर्षांची अवनीत यांच्यातील किसिंग सीन कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकरी करत आहेत. ‘नवाजुद्दीनच्या चित्रपटांची निवड चुकतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा किसिंग सीन शूट करताना अवनीत 20 वर्षांची असेल, हे चुकीचं आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीनने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. नवाजुद्दीनने अवनीतसोबतच्या किसिंग सीनचं समर्थन केलं आहे.
“कशाला काही समस्या असेल? रोमान्सला वयाचं बंधन नसतं. पण खरी समस्या ही आहे की तरुणांमध्ये काहीच रोमान्स उरला नाही. आम्ही त्या जमान्याचे आहोत जेव्हा रोमान्सची गोष्टच वेगळी होती. आम्ही प्रेमात असू आणि वर्षानुवर्षे आम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करू. आज शाहरुख खान अजूनही रोमँटिक भूमिका साकारतो, कारण तरुण पिढी ‘नल्ली’ (बेकार) आहे. त्यांना रोमान्सच माहीत नाही”, असं नवाजुद्दीन म्हणाला.
नवाजुद्दीन पुढे म्हणाला, “आजकाल सर्वकाही व्हॉट्सॲपवरच होतं. मग ते प्रेम असो किंवा ब्रेकअप. यामागे एक कारण आहे. रोमान्समध्ये जगलेले लोकच रोमान्स करू शकतात, आणखी कोण करणार?” टिकू वेड्स शेरू या चित्रपटातून टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. अभिनेत्री कंगना रनौतचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात शेरू (नवाजुद्दीन) हा स्ट्रगलिंग अभिनेता मुंबईत करिअर करण्यासाठी संघर्ष करत असतो. त्याचे कुटुंबीय त्याच्या लग्नासाठी जी मुलगी (टिकू) शोधतात आणि तिलासुद्धा अभिनेत्री व्हायचं असतं. भोपालमधून बाहेर पडून मुंबईतील बॉलिवूडमध्ये करिअर करता येईल यासाठी ती लग्नाला होकार देते. या दोघांचं लग्न होतं आणि त्यापुढील रंजक कथा चित्रपटात पहायला मिळणार आहे.
अभिनेत्री अवनीत कौर अवघ्या 21 व्या वर्षी सोशल मीडिया स्टार बनली आहे. तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. वयाच्या 21 व्या वर्षी अवनीतची एकूण संपत्ती जवळपास 11 कोटी रुपयांच्या घरात आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 32 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.