नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्याच्या आईबद्दल मोठी अपडेट समोर

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ; पत्नी नंतर अभिनेत्याच्या भावाने आणि आईच्या केअर टेकरने घेतला मोठा निर्णय... आता याप्रकरणी पुढे काय होणार?

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्याच्या आईबद्दल मोठी अपडेट समोर
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 9:45 AM

Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) याच्या खासगी आयुष्यात सध्या अनेक चढ – उतार सुरु आहेत. पत्नी आलिया सिद्दीकी (nawazuddin siddiqui wife) हिने केलेल्या गंभीर आरोपांनंतर अभिनेता दिवसागणिक अधिक वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नीमध्ये असलेल्या वादानंतर, अभिनेत्याचे भावासोबत असलेले वाद देखील समोर आले आहेत. गुरुवारी रात्री नवाजुद्दीन सिद्दीकी आईला भेटण्यासाठी वर्सोवा याठिकाणी असलेल्या बंगल्यावर पोहोचला होता. पण नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या भावाने अभिनेत्याला आईला भेटू दिलं नाही.

आजारी आईला भेटण्यासाठी अभिनेता वर्सोवा याठिकाणी असलेल्या बंगल्यावर पोहोचला. पण अभिनेत्याच्या भावाने आणि आईच्या केअर टेकरने त्याला आईला भेटण्याची परवानगी दिली नाही. आईला कोणालाही भेटायचं नाही असं सांगत अभिनेत्याला आजारी आईला भेटू दिलं नाही. (nawazuddin,nawazuddin siddiqui case)

रिपोर्टनुसार, अभिनेता कामासाठी डेहराडूनमध्ये होता. पण आईची प्रकृती खालावल्यामुळे अभिनेता मुंबई येथे आला. पण घरी येताच अभिनेत्याला आईला भेटू दिलं नाही. ज्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी तेथून निघून गेला. सध्या खासगी आयुष्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी तुफान चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाने अभिनेत्यावर गंभीर आरोप केला. नवाजुद्दीन सिद्दीकी याचा भाऊ म्हणाला, अभिनेता त्याच्या जवळच्या लोकांची साथ देत नाही. शिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी याने कोणत्याही भावाचं करियर पुढे नेण्यास मदत केली नाही.. असा आरोप देखील अभिनेत्यावर लावण्यात आला आहे.

अभिनेत्याचा भाऊ पुढे म्हणाला, ‘मी अनेक टीव्ही शो केले आहेत. काही शोचं दिग्दर्शन देखील केलं आहे. नवाजने मला त्याच्यासोबत काम करण्यास सांगितलं. २०१९ रोजी ‘बोले चूडिया’ सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याला मी नको होतो.’ असं देखील अभिनेत्याचा भाऊ म्हणाला आहे.

‘नवाजुद्दीन सिद्दीकी सर्वांची काळजी घेतो. पण त्याने कधीही कोणाला करियरमध्ये मदत केली नाही. तो आमच्यासाठी संपत्ती खरेदी करतो. पण जशी त्याची प्रतिभा तसा तो नाही. कालांतराने तो लोकांना सोडून देतो. मी आणि आलिया या गोष्टीचा उदाहरण आहोत…’ भावाच्या वक्तव्यामुळे देखील अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. (nawazuddin siddiqui property)

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने देखील त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने मुंबई पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार नोंदवली होती. आलियाने पतीवर बलात्काराचे देखील आरोप लावले आहेत. शिवाय आलियाच्या वकिलांनी देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.