पत्नी आणि मोलकरीणीच्या आरोपांवर अखेर नवाजुद्दीन सिद्दिकीने सोडलं मौन, म्हणाला “मी विनंती करतो..”

आधी पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर मोलकरीणीनेही कोणतीच कसर सोडली नाही. नंतर मात्र तिने आरोपांना मागे घेत नवाजुद्दीनची माफी मागितली. दबावाखाली येऊन आरोप केल्याचं तिने स्पष्ट केलं. आता या संपूर्ण प्रकरणी नवाजुद्दीनची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पत्नी आणि मोलकरीणीच्या आरोपांवर अखेर नवाजुद्दीन सिद्दिकीने सोडलं मौन, म्हणाला मी विनंती करतो..
Nawazuddin Siddiqui
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 3:09 PM

मुंबई : आपल्या दमदार अभिनयकौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आधी पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर मोलकरीणीनेही कोणतीच कसर सोडली नाही. नंतर मात्र तिने आरोपांना मागे घेत नवाजुद्दीनची माफी मागितली. दबावाखाली येऊन आरोप केल्याचं तिने स्पष्ट केलं. आता या संपूर्ण प्रकरणी नवाजुद्दीनची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पत्नी आलिया सिद्दिकीने नवाजुद्दीनवर आरोप केले होते की तिला घरात बंदिस्त केलं जातंय. तिला बाहेर जाऊ दिलं जात नाहीये. मित्रमैत्रिणींनी पाठवलेलं जेवणसुद्धा तिच्यापर्यंत पोहोचवलं जात नाही. एकंदरीत तिला खूप त्रास जातो, असा आरोप आलियाने केला. हे भांडण एका प्रॉपर्टी वादावरून सुरू झालं होतं आणि आता ते शमण्याचं नावंच घेत नाहीये. याप्रकरणी नवाजुद्दीनच्या मोलकरीणीने धक्कादायक दावे केले होते.

हे सुद्धा वाचा

दुबईहून तिने रडतानाचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टमध्ये तिने नवाजुद्दीनवर बरेच आरोप केले होते. मात्र लगेच तिने दुसरा व्हिडीओ पोस्ट करत नवाजुद्दीनवरील सर्व आरोप मागेसुद्धा घेतले. या सर्व प्रकरणावर नवाजुद्दीन म्हणाला, “हे पहा, मला या सर्व प्रकरणी काहीच बोलायची इच्छा नाही. पण माझ्या मुलांच्या अभ्यासावर त्याचा वाईट परिणाम होतोय. माझी मुलं दुबईत शिकतायत. माझी इतकीच विनंती आहे की माझ्या मुलांनी शाळेत जावं आणि अभ्यास करावं. मला बाकी काहीच बोलायचं नाहीये.”

नवाजुद्दीन सिद्दिकीने 2010 मध्ये अंजना किशोर पांडेशी लग्न केलं. त्यानंतर तिने आलिया असं नाव बदललं. हे नवाजुद्दीनचं दुसरं लग्न आहे. त्याआधी त्याने शिबा नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं. पण या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. बॉलिवूडमध्ये स्टार होण्याआधीपासून नवाजुद्दीन आलियाला ओळखायचा.

मे 2020 मध्ये आलियाने नवाजुद्दीनला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलं. तिने पतीवर बरेच आरोपसुद्धा केले होते. मात्र काही दिवसांनी पुन्हा तिने संसाराला एक नवीन संधी देण्याचा विचार केला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.