AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॉयल आयुष्य जगते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; प्रायव्हेट विमान, १०० कोटींचा भव्य बंगला आणि बरंच काही…

सर्वत्र प्रसिद्ध अभिनेत्रीच्या रॉयल आयुष्याचीच चर्चा... एक दोन नाही तर, अभिनेत्रीचे चार शहरांमध्ये भव्य घर... संपत्तीचा आकडा थक्क करणारा...

रॉयल आयुष्य जगते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; प्रायव्हेट विमान, १०० कोटींचा भव्य बंगला आणि बरंच काही...
| Updated on: Jul 08, 2023 | 12:05 PM
Share

मुंबई | बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे आणि महागड्या वस्तूंमुळे चर्चेत असतात. झगमगत्या विश्वात असे काही सेलिब्रिटी आहे, ज्यांची भारतात तर संपत्ती आहेच, पण परदेशात देखील सेलिब्रिटींची कोट्यवधींची संपत्ती आहे. फक्त बॉलिवूड कलाकार नाही तर,दाक्षिणात्य सिनेविश्वातील सेलिब्रिटी देखील त्यांच्या महागड्या लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असतात. कोट्यवधींची संपत्ती, भव्य बंगले, महागड्या गाड्या…इत्यादी गोष्टींमुळे झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम चर्चेत असतात. आता एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे. ज्या अभिनेत्रीच्या रॉयल आयुष्याची चर्चा रंगत आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नयनतारा आहे.

अभिनेत्रीकडे प्रायव्हेट जेट, भव्य बंगला, महागड्या गाड्या तर आहेत, पण अभिनेत्री प्रचंड रॉयल आयुष्य जगते. नयनतारा फक्त सिनेमांमधून नाही तर इतर मार्गांनी देखील कोट्यवधी रुपयांची माया कमावते. अभिनेत्री एकून संपत्तीचा आकडा थक्क करणारा आहे. नयनतारा कायम तिच्या कामामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

भारतात चार शहरांमध्ये नयनताराचे भव्य घर

मीडिया रिपोर्टनुसार, नयनतारा हिचं हैदराबाद याठिकाणी १५ कोटी रुपयांचं घर आहे. चेन्नईमध्ये अभिनेत्रीचं ४ बीएचके घर आहे. अभिनेत्रीच्या चेन्नईतील घराची किंमत १०० कोटी रुपये आहे. केरळ आणि मुंबई याठिकाणी देखील नयनतारा हिचं आलिशान घर आहेत. त्या घरांची किंमत देखील कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

फक्त आलिशान चार घरंच नाही तर, अभिनेत्री देशभरात स्वतःच्या प्रायव्हेट विमानाने फिरते. अभिनेत्रीच्या प्रायव्हेट जेटची किंमत देखील कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. नयनतारा हिचं कार कलेक्शन देखील भन्नाट आहे. अभिनेत्रीकडे बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज कार आहे, जिची किंमत ८८ लाख रुपये आहे. शिवाय नयनतारा हिच्याकडे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, फोर्ड आणि बीएमडब्ल्यू ७ सीरिज देखील आहे.

रिपोर्टनुसार अभिनेत्रीच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर, तिची नेटवर्थ २२ मिलियन म्हणजे जवळपास १६५ कोटी आहे. नयनतारा एका सिनेमासाठी तब्बल १० कोटी रुपये घेते. अभिनेत्रीच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा आहे.

नयतारा कायम तिच्या संपत्तीमुळे आणि खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नयनतारा हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. सोशल मीडियावर देखील कायम अभिनेत्रीच्या चर्चा रंगलेल्या असतात.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.