Neelam Kothari | गोविंदाच्या प्रेमात होती नीलम कोठारी, घटस्फोट झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्यासोबत केलं दुसरं लग्न

अभिनेता गोविंदा याच्यासोबत नीलम कोठारी हिची 'अधुरी प्रेम कहाणी', पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 'या' अभिनेत्यासोबत जगतेय आनंदी वैवाहिक आयुष्य...

Neelam Kothari | गोविंदाच्या प्रेमात होती नीलम कोठारी, घटस्फोट झाल्यानंतर 'या' अभिनेत्यासोबत केलं दुसरं लग्न
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 2:27 PM

मुंबई : एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांच्या नावाची चर्चा होती. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी रिल आणि रिअल आयुष्यात देखील डोक्यावर घेतलं. आजही चाहत्यांमध्ये गोविंदा आणि नीलम यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते. गोविंदा आणि नीलम यांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यांच्या सिनेमांना देखील चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं. नीलम हिने १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘जवानी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने हत्या, खुदगर्ज, लव्ह 86, दो कैदी, अफसाना प्यार का यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. अनेक सिनेमे एकत्र केल्यानंतर गोविंदा आणि नीलम एकमेकांच्या प्रेमात पडले. पण दोघांची प्रेम कहाणी पूर्ण होवू शकली नाही. आज अभिनेत्री दुसऱ्या पतीसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

गोविंदा आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांची पहिली ओळख प्राणलाल मेहता यांच्या ऑफिसमध्ये झाली. गोविंदा एका नजरेत अभिनेत्रीच्या प्रेमात पडले… अभिनेत्याने दोघांच्या पहिल्या भेटीबद्दल देखील एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ‘पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत होती.’ पण नीलम हिच्यासोबत बोलण्यासाठी गोविंदा घाबरत होता.

नीलम हिने तिच्या करियरमध्ये तब्बल ४५ सिनेमांपेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. ज्यामध्ये १० सिनेमांमध्ये गोविंदा आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. गोविंदा आणि नीलम कोठारी यांची जोडी प्रचंड हीट झाली. अनेक निर्माते आणि दिग्दर्शक दोघांसोबत काम करण्यासाठी प्रतीक्षेत होते.

हे सुद्धा वाचा

गोविंदा आणि नीलम कोठारी यांनी इल्जाम, खुदगर्ज, सिंदूर, घर में राम गली में शाम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. सिनेमांमुळे होत असलेल्या भेटींमुळे दोघांचं प्रेम दिवसागणिक वाढत होतं. दोघांना एकमेकांसोबत लग्न देखील करायचं होतं. याच कारणामुळे गोविंदा याने सुनीता हिच्यासोबत झालेला साखरपुडा देखील मोडला होता.

पण आईच्या इच्छेमुळे गोविंदाने १९८७ साली सुनीता हिच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्याचं लग्न झालं आहे, हे माहिती पडल्यानंतर नीलम हिला वाईट वाटेल म्हणून गोविंदा अभिनेत्रीपासून लग्न झालं आहे… ही गोष्ट लपवली. असं देखील अनेकदा समोर आलं. पण वेळेनुसार दोघे एकमेकांपासून दूर झाले.

नीलम हिने २००० साली परदेशातील ऋषी सेठिया यांच्यासोबत लग्न केलं. ऋषी उद्योजकाचे पूत्र होते. पण दोघांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नीलम हिने २०११ साली अभिनेता समीर सोनी याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर २०१३ साली दोघांनी एका मुलीला दत्तक घेतलं. आता नीलम दुसऱ्या पतीसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?.
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?.
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी.
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?.
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली.
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले.
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा.
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य.
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी.