AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डॅड.. तुम्ही चांगलं केलंत’, विवियन रिचर्ड्स यांच्या वाढदिवशी मसाबा गुप्ताच्या पोस्टने वेधलं लक्ष

अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांना मसाबा ही मुलगी आहे. मसाबा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे. नीना आणि विवियन यांनी लग्न केलं नाही. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलंय.

'डॅड.. तुम्ही चांगलं केलंत', विवियन रिचर्ड्स यांच्या वाढदिवशी मसाबा गुप्ताच्या पोस्टने वेधलं लक्ष
Neena Gupta, Vivian Richards, Masaba GuptaImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2025 | 3:31 PM
Share

मुंबई : अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर सर विवियन रिचर्ड्स यांचं अफेअर सर्वश्रुत आहे. या दोघांनी कधी लग्न केलं नाही, कारण विवियन हे आधीच विवाहित होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही नीना आणि विवियन यांची मुलगी आहे. मसाबाने नुकतंच दुसरं लग्न केलं. यावेळी विवियन रिचर्ड्स हे भारतात आले होते आणि त्यांनी खास लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी पहिल्यांदाच नीना गुप्ता, मसाबा आणि विवियन रिचर्ड्स हे सर्वजण एकाच फ्रेममध्ये दिसले. आता विवियन यांच्या वाढदिवसानिमित्त मसाबाने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. वडिलांसोबतचे तिने दोन फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

मसाबाने तिच्या रिसेप्शन पार्टीतील विवियन यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मसाबा आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा हे विवियन यांच्यासोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. या तिघांचा हा पाठमोरा फोटो आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये मसाबाने लिहिलं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅड. तुम्ही चांगलं केलंत. आम्हीसुद्धा खूप चांगलं केलंय. यापुढे मी कोणत्याही भीतीशिवाय ज्या गोष्टी करेन, त्या तुम्हाला दाखवण्यासाठी खूपच उत्सुक आहे.’

मसाबाच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. आजवर बऱ्याच मुलीखतींमध्ये नीना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी आणि विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. नीना आणि विवियन यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.

मसाबा गुप्ताची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Masaba (@masabagupta)

जयपूरच्या राणीमुळे झाली होती नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांची पहिली भेट

नागपुरात पार पडलेल्या एका सामन्यात भारताचा दोन धावांनी पराजय झाला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजचे सर्व खेळाडू विजयाचा जल्लोष साजरा करत होते. त्यावेळी जेव्हा नीना यांनी कर्णधार विवियन रिचर्ड्स यांना पाहिलं, तेव्हा त्या प्रभावित झाल्या होत्या. विवियन रिचर्ड्स हे त्यावेळी विजयामुळे फार खुश नव्हते. अगदी शेवटच्या क्षणी बाजी पलटली होती आणि त्याची जाणीव त्यांना होती. त्यांची हीच बाब नीना यांना आवडली होती. मॅचच्या एक दिवसानंतर जयपूरच्या राणीने वेस्ट इंडिजच्या टीमसाठी खास डिनर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला त्यांनी संपूर्ण टीमला आमंत्रित केलं होतं.

त्याचवेळी विनोद खन्ना यांच्या ‘बंटवारा’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. राणीने या चित्रपटाच्या टीमलाही डिनरला आमंत्रित केलं होतं. या चित्रपटात नीना गुप्ता यांचीही भूमिका असल्याने, त्यासुद्धा पार्टीला गेल्या होत्या. याच डिनर पार्टीत पहिल्यांदा नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची भेट झाली होती.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.