बॉयफ्रेंडच नाही तर, पतीने देखील सोडली साथ; आज ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा साभांळ करतात ‘या’ अभिनेत्री

वयाच्या १६ व्या वर्षी लग्न १७ व्या वर्षी दोन मुलांची जबाबदारी, विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवल्यामुळे करावा लागला संघर्ष... आज झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री 'सिंगल मदर' म्हणून करतात मुलांचा साभांळ

बॉयफ्रेंडच नाही तर, पतीने देखील सोडली साथ; आज 'सिंगल मदर' म्हणून मुलांचा साभांळ करतात 'या' अभिनेत्री
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 10:16 AM

मुंबई | झगमगत्या विश्वातून अनेक चांगल्या – वाईट गोष्टी चाहत्यांच्या समोर येत असतात. सेलिब्रिटींचे आगामी सिनेमे, त्यांचे अफेअर्स, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट… इत्यादी गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. पण झगमगत्या विश्वात काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, त्या खचल्या देखील… पण अभिनेत्रींनी हार मारली नाही. सर्व प्रसंगांवर मात करत झगमगत्या विश्वातील काही अभिनेत्रींनी स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आणि ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ केलं. एका अभिनेत्रीचं १६ वर्षी लग्न झालं आणि १७ व्या वर्षी तिच्या खांद्यावर दोन मुलांची जबाबदारी पडली.. तर विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवणे अभिनेत्रीला महागात पडलं. काही अभिनेत्रींनी तर लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. तर आज जाणून अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी सर्व संकटांवर मात करत मुलांचा योग्य रित्या सांभाळ केला.

एकता कपूर | टीव्ही विश्वाची क्विन एकता कपूर हिने देखील लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. एकता आता एकटी मुलगा रवी याचा सांभाळ करत आहे. एकता कपूर हिने २०१९ मध्ये सरोगेसीच्या माध्यमातून रवीचं जगात स्वागत केलं.

अभिनेत्री जुही परमार | अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ – उतार आले. पण अभिनेत्री कधीच हार मानली नाही. अभिनेता सचिन श्रॉफ याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री ‘सिंगल मदर’ म्हणून लेकीचा सांभाळ करत आहे. दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

अभिनेत्री साक्षी तन्वर | साक्षीने देखील लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. २०१९ साली साक्षीने ९ महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतलं. अनेक ठिकाणी साक्षी तिच्या लेकीसोबत दिसते.

अभिनेत्री श्वेता तिवारी | श्वेताने दोन लग्न केली. पण दोन्ही लग्नात अभिनेत्रीला अपयश मिळालं. आता अभिनेत्री सिंगल मदर म्हणून दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे. श्वेताची मोठी मुलगी आणि अभिनेत्री पलक तिवारी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन | सुष्मिताचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर अभिनेत्रीने दोन मुलींना दत्तक घेतलं. सुष्मिताच्या दोन मुलींचं नाव रिना आणि अलीशा असं आहे.

अभिनेत्री उर्वशी ढोलकिया | म्हणजे टीव्ही विश्वातील कोमलिका… उर्वशी हिचं लग्न वयाच्या सोळाव्या वर्षी झालं आणि १७ व्या वर्षी तिच्या खांद्यावर दोन मुलांची जबाबदारी पडली. पण अभिनेत्रीला पतीची साथ मिळाली नाही. आजही अभिनेत्री ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे.

अभिनेत्री नीना गुप्ता | सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नीना यांनी विवाहित पुरुषाला कधीच डेट करु नका असा सल्ला तरुणींना दिला होता. कारण त्या देखील विवाहित विवियन रिचर्ड यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. आज नीना प्रसिद्ध अभिनेत्री असून, त्यांची मुलगी मसाबा गुप्ता बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.