Neetu Kapoor : ऋषी कपूर यांच्या अफेअरबद्दल नीतू यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, ‘ते फक्त वन नाईट स्टँड…’

ऋषी कपूर यांच्या वन नाईट स्टँडबद्दल पत्नी नीतू कपूर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'मला सगळं कळत होतं, पण....', अनेक वर्षांनंतर ऋषी कपूर यांच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा...

Neetu Kapoor : ऋषी कपूर यांच्या अफेअरबद्दल नीतू यांचं मोठं वक्तव्य;  म्हणाल्या, 'ते फक्त वन नाईट स्टँड...'
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 11:03 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत राहणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे अफेअर्स. काही सेलिब्रिटींच्या अफेअर्सची चर्चा लग्नाआधी रंगली, तर काहींची मात्र लग्नानंतर. काही अभिनेत्यांसाठी प्रेमासाठी पहिल्या पत्नीला देखील सोडून दिलं. सध्या चर्चा रंगत आहे अभिनेते ऋषी कपूर यांच्या अफेअरची. खुद्द अभिनेत्री नीतू कपूर यांनी पती ऋषी कपूर यांच्या अफेअरबद्दल सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर एका पेपरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी ऋषी कपूर यांच्या अफेअरबद्दल सांगितलं. शिवाय पतीच्या अनेक अफेअर्सबद्दल माहिती पडल्यानंतर नीतू कपूर काय करायच्या? हे देखील व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसत आहे.

वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नीतू कपूर म्हणाल्या, ‘मी ऋषी कपूर यांना अफेअर करताना पडकलं आहे. त्यांना इतर महिलांसोबत फ्लर्ट करताना मी पाहिलं आहे. जेव्हा त्यांचं दुसऱ्या कोणत्या महिलेसोबत अफेअर सुरु असायचं, तेव्हा मला सर्व काही कळत होतं. पण मला माहिती होतं, त्यांचं अफेअर म्हणजे फक्त वन नाईट स्टँड होते…’

‘लग्नानंतर दोन वर्ष यामुळे आमची प्रचंड भांडणं झाली. पण नंतर मला कळायला लागलं होतं. त्यामुळे त्याच्या अफेअर्सचा मला काहीही फरक पडत नव्हता… हे सगळं किती दिवस चालणार हेच मला पहायचं होतं. ऋषी यांना कायम प्रश्न पडायचा, मला त्यांच्या अफेअरबद्दल कसं समजतं.. माझे अनेक मित्र होते, ते मला ऋषी यांच्याबद्दल सर्वकाही सांगायचे…’

हे सुद्धा वाचा

पुढे नीतू कपूर म्हणाल्या, ‘तेव्हा मी माझ्या मित्रांना सांगायची मला सर्वकाही माहिती आहे आणि मला हे सगळं काही विसरायचं आहे… पण मला माहिती होतं ऋषी कायम त्यांच्या कुटुंबाला जास्त महत्त्व द्यायचे. त्यामुळे ते मला सोडतील याची भीती मला बिलकूल नव्हती. ते पूर्णपणे माझ्यावर अवलंबून होते. ते माझ्याशिवाय राहूच शकत नव्हते…’

‘मला असं वाटतं पुरुषांना थोडं स्वतंत्र द्यायला हवं, फ्लर्ट करणं त्यांच्या स्वभावात असतं. पुरुषांना कोणी बांधून ठेवू शकत नाही. पण जर दुसऱ्या महिलेसोबत नातं फार पुढे गेलं असेल तर, मी त्यांना घराबाहेर काढलं असतं आणि म्हणाली असती जा तिच्यासोबतच राहा…’ सध्या सर्वत्र नीतू कपूर यांनी व्यक्त केलेल्या भावना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

ऋषी कपूर यांचं 2020 साली निधन झाले. या काळामध्ये त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी त्यांना खूप साथ दिली. परंतू ऋषी कपूर यांच्या जाण्यांनी नीतू कपूर यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. पतीच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.