Neetu Kapoor यांच्याकडून गर्लफ्रेंडसाठी लव्हलेटर लिहून घ्यायचे ऋषी; पण अभिनेत्याच्या ब्रेकअपनंतर…
अनेक अभिनेत्रींसोबत ऋषी कपूर याचं नाव जोडण्यात आलं; नीतू यांच्या लिहून घ्यायचे गर्लफ्रेंडसाठी 'लव्हलेटर...', नीतू यांच्या आईला मान्य नव्हतं नातं, पण...
मुंबई : बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी आज त्यांच्या आयु्ष्यात प्रचंड आनंदी आहेत. ८०, ९० च्या दशकातील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते.. रेखा, अमिताभ बच्चन, जया बच्चन यांच्याबद्दल तर अनेक चर्चा रंगत असतात. पण दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या नात्याबद्दल देखील अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. चाहत्यांना अभिनेत्री नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या नात्याबद्दल माहित आहे. पण आयुष्यात नीतू कपूर यांची एन्ट्री होण्याआधी देखील अभिनेत्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं. सुरुवातीला नीतू कपूर आणि ऋषी कपूर चांगले मित्र होते. पण अशी एक वेळ आली जेव्हा दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं..
ऋषी कपूर यांनी जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा असंख्य मुली त्यांच्या प्रेमात बुडाल्या… शिवाय अनेक अभिनेत्रींसोबत त्यांनी सिनेमांमध्ये स्क्रिन देखील शेअर केली. ‘बॉबी’ सिनेमात अभिनेत्री डिंपल कपाडीया यांच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगाली. त्यानंतर १९७४ साली प्रदर्शित झालेल्या ‘जहरीला इंसान’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान नीतू आणि ऋषी यांच्यातील मैत्री घट्ट झाली…
जेव्हा नीतू आणि ऋषी यांची ओळख झाली तेव्हा नीतू फक्त १५ वर्षांच्या होत्या.. सेटवर दोघांमध्ये मस्ती, वाद होवू लागले.. वादाचं रुपांतर काही दिवसांनी प्रेमात झालं.. पण तेव्हा ऋषी कपूर यांच्या आयुष्यात एक मुलगी होती.. गर्लफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर तिची समज काढण्यासाठी ऋषी, नीतू यांच्याकडून ‘लव्हलेटर’ लिहून घ्यायचे..
पण गर्लफ्रेंडसोबत ऋषी कपूर यांचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही.. पण सेटवर काम करता-करता नीतू आणि ऋषी एकमेकांच्या प्रेमात पडले.. नीतू यांचं ऋषी यांच्या घरातील येण्या-जाण्याचं प्रमाण वाढलं.. एक दिवस ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर यांनी अभिनेत्याला विचारलं.. तुला खरंच नीतू आवडत असेल तर लग्न कर…
कपूर कुटुंबियांना सून म्हणून नीतू कपूर आवडू लागल्या होत्या.. पण नीतू कपूर यांच्या आईला लेकीचं नातं मान्य नव्हतं. आधी करियरकडे लक्ष दे त्यानंतर लग्न.. असं नीतू यांच्या आईचं म्हणणं होतं. पण कालांतराने नीतू यांच्या आईने देखील लग्नासाठी होकार दिला.. अखेर ११ जानेवारी १९८० साली ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचं लग्न झालं.. आज ऋषी कपूर जिवंत नसले तरी त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.