Shah Rukh Khan | ‘सेक्स आणि शाहरुख’, 20 वर्षांपूर्वी नेहा धुपियाने केलं होतं विधान, म्हणाली “आजही तेच खरं ठरतंय”

पठाणच्या या यशादरम्यान अभिनेत्री नेहा धुपियाचं जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 2004 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने शाहरुखविषयी हे वक्तव्य केलं होतं. आता 20 वर्षांनंतर तिने पुन्हा एकदा त्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे.

Shah Rukh Khan | 'सेक्स आणि शाहरुख', 20 वर्षांपूर्वी नेहा धुपियाने केलं होतं विधान, म्हणाली आजही तेच खरं ठरतंय
Shah Rukh Khan and Neha DhupiaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 2:21 PM

मुंबई: ‘पठाण’च्या दमदार कमाईसह अभिनेता शाहरुख खानने बॉलिवूडचा ‘किंग’ आपणच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या चित्रपटाला फक्त भारतातच नाही तर देशभरात तुफान प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चार दिवसांत ‘पठाण’ने 400 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पठाणच्या या यशादरम्यान अभिनेत्री नेहा धुपियाचं जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 2004 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने शाहरुखविषयी हे वक्तव्य केलं होतं. आता 20 वर्षांनंतर तिने पुन्हा एकदा त्या वक्तव्याचा उल्लेख करत शाहरुखचं कौतुक केलं आहे.

2004 मध्ये दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली होती, “एकतर सेक्स विकलं जातं किंवा मग शाहरुख खान”. आता या वक्तव्यावरून ट्विट करत नेहाने पुन्हा लिहिलं, ’20 वर्षांनंतरही माझं हे वक्तव्य खरं ठरतंय. हे एखाद्या अभिनेत्याचं करिअर नाही तर किंगची सत्ता आहे.’

हे सुद्धा वाचा

2004 मध्ये नेहा धुपियाचा ‘जुली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने इंटिमेट सीन्स केले होते. यामध्ये नेहाने देहविक्रेय महिलेची भूमिका साकारली होती. याच भूमिकेवरून तिला त्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली होती, “जुली या चित्रपटात बरेच इंटिमेट सीन्स आहेत, ज्यामध्ये माझ्या शरीराला दाखवलं गेलं आहे. मला सेक्स सिम्बॉलच्या टॅगने काही फरक पडत नाही. जुलीमध्ये अशी भूमिका साकारून मी मल्लिका शेरावत आणि बिपाशा बासू यांना मागे टाकलं, असं लोक म्हणाले तरी मला फरक पडत नाही. आजच्या घडीला एकतर सेक्स विकलं जातं किंवा मग शाहरुख खान.”

नेहा धुपियाचं ट्विट-

नेहा धुपियाने असं वक्तव्य का केलं, याबद्दल तिने नंतर दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. “आजच्या घडीला अनेक गोष्टी वेळेनुसार बदलत आहेत. मात्र एक गोष्ट आजही जशीच्या तशी आहे, ती म्हणजे एकतर सेक्स विकलं जातं किंवा मग शाहरुख खान.”

शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.