‘बिग बॉस 17’मध्ये भाऊ-वहिनीची भांडणं पाहून बहिणीने व्यक्त केली नाराजी; म्हणाली “खऱ्या आयुष्यात..”

‘बिग बॉस 17’ या शोमध्ये टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने पती नील भट्टसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाली. पहिल्या दिवसापासून ही जोडी बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. आता नीलच्या बहिणीने दोघांच्या भांडणावर प्रतिक्रिया दिली आहे.

'बिग बॉस 17'मध्ये भाऊ-वहिनीची भांडणं पाहून बहिणीने व्यक्त केली नाराजी; म्हणाली खऱ्या आयुष्यात..
Neil Bhatt and Aishwarya SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 7:25 PM

मुंबई : 8 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’ सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे आणि त्यापैकीच एक कारण म्हणजे यात सहभागी झालेले कपल्स. एकीकडे अंकिता लोखंडे-विकी जैन यांची सतत भांडणं होत असतानाच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा या जोडीमध्येही सतत वादविवाद सुरू असल्याचं पहायला मिळतंय. बिग बॉसने अंकिता आणि विकीच्या आईला त्यांच्याशी बोलण्याची संधी दिली होती. त्यावेळी त्यांनी दोघांना समजावलं आणि भांडण न करण्याची विनंती केली. आता नील भट्ट आणि ऐश्वर्याच्या भांडणांवर नीलची बहीण शिखाची प्रतिक्रिया समोर आली आहे. शिखा परदेशात राहत असली तर भाऊ आणि वहिनीसाठी दररोज ‘बिग बॉस 17’चा एपिसोड पाहत असल्याचं तिने सांगितलं.

“मी दररोज बिग बॉसचा एक तासाचा एपिसोड आवर्जून पाहते. इतर चाहत्यांप्रमाणेच माझ्या संपूर्ण कुटुंबीयांना हा शो आवडतो. बिग बॉसच्या घरातील नीलचा स्वभाव इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. सुरुवातीलाच तो सगळ्यांशी भांडत बसला नाही. आधी त्याने संपूर्ण खेळाचं, प्रत्येक व्यक्तीचं निरीक्षण केलं आणि त्यानंतर तो स्वत:ची बाजू मांडू लागला. त्याने कधीच गेम प्लॅनिंग, फसवणूक केली नाही. तो फक्त सर्व गोष्टींचं निरीक्षण करत राहिला आणि परिस्थितीनुसार वागत गेला”, असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

वहिनी ऐश्वर्याबद्दल ती पुढे म्हणाली, “वीकेंड का वार एपिसोडनंतर ऐश्वर्याला ज्या प्रतिक्रिया मिळतात, त्यातून सावरत 10 पटीने अधिक सक्षम होऊन खेळात पुढे येणं सोपं नाही. त्यामुळे तिच्या या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं. मी हे नेहमीच म्हणते की नील आणि ऐश्वर्याची जोडी ही आग आणि बर्फासारखी आहे. ते दोघं एकमेकांचे चांगले साथीदार आहेत.”

बिग बॉसच्या घरात ऐश्वर्या आणि नील यांच्या अनेकदा भांडणं झाली. नॅशनल टेलिव्हिजनवर स्वत:च्या भावाला आणि वहिनीला अशा पद्धतीने भांडताना पाहून कसं वाटतं, याविषयी शिखा पुढे म्हणाली, “मला त्यांच्या भांडणाविषयी फारशी चिंता नाही. पण मध्यंतरीच्या काळात आम्ही थोडे नाराज होतो. कारण खऱ्या आयुष्यात आम्ही त्यांच्यासोबत सतत राहिलोय. मी नीलला गेल्या 32 वर्षांपासून ओळखते आणि त्याच्यासोबत मी राहिले आहे. मी ऐश्वर्यालाही खूप चांगल्या प्रकारे ओळखते. तीसुद्धा आमच्यासोबत राहिली आहे. खऱ्या आयुष्यात ते एकमेकांसोबत असे नाहीत हे मला माहीत आहे. एकमेकांना ते फार समजून घेतात आणि माझ्यासाठी ती आदर्श जोडी आहे. त्यामुळे जेव्हा टीव्हीवर मी दोघांची भांडणं पाहिली, तेव्हा मला थोडा धक्का बसला.”

नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. लॉकडाऊनच्या काळात नील आणि ऐश्वर्याने लग्नगाठ बांधली.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.