‘हा कसा मुलगा आहे’, आईच्या अंत्यविधीला पोहोचलेला उदय चोप्रा ट्रोल; नेटकऱ्यांमध्येच पडले दोन गट

निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि अभिनेता उदय चोप्रा ही पामेला यांची मुलं आहेत. तर अभिनेत्री राणी मुखर्जी ही त्यांची सून आहे. पामेला यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या व्हेंटिलेटरवर होत्या.

'हा कसा मुलगा आहे', आईच्या अंत्यविधीला पोहोचलेला उदय चोप्रा ट्रोल; नेटकऱ्यांमध्येच पडले दोन गट
Uday Chopra Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 8:51 AM

मुंबई : दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका पामेला चोप्रा यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पामेला त्यांच्या अंत्यदर्शनासाठी इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी पामेला यांचा मुलगा आणि अभिनेता उदय चोप्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. उदयचा बदललेला अवतार पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. पापाराझींनी त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले असून याच व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी उदयच्या दिसण्यावरून तर काहींनी त्याच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोल केलं.

एकीकडे काहींनी उदयला ट्रोल केलं, तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी ट्रोल करणाऱ्यांनाच खडेबोल सुनावले. ‘मित्रांनो, त्याने त्याच्या आईला गमावलंय. त्याचं सांत्वन करू शकत असाल तर करा अन्यथा त्याची खिल्ली उडवणं बंद करा’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुम्ही सहवेदना व्यक्त करू शकत नसाल तर किमान मस्करी करणं तरी थांबवा’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘थोडीतरी माणुसकी जपा’ अशा शब्दांत काही नेटकऱ्यांनी ट्रोलर्सना सुनावलंय.

हे सुद्धा वाचा

निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि अभिनेता उदय चोप्रा ही पामेला यांची मुलं आहेत. तर अभिनेत्री राणी मुखर्जी ही त्यांची सून आहे. पामेला यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या व्हेंटिलेटरवर होत्या.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या यशराज फिल्म्सच्या ‘द रोमँटिक्स’ या डॉक्युमेंट्रीत पामेला यांची शेवटची झलक दिसली होती. पार्श्वगायिका, लेखन, निर्मिती अशा क्षेत्रांत त्यांचा हातखंडा होता. यशराज फिल्म्सच्या अनेक चित्रपटांसाठी गायन, लेखन, वेशभूषाकार आणि सहनिर्माता अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

1976 मधील ‘कभी कभी’पासून ते 2002 मधील ‘मुझसे शादी करोगी’पर्यंत असंख्य गाणी पामेला चोप्रा यांनी गायली आहेत. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आईना’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. त्याचसोबत त्यांनी पती यश चोप्रा, मुलगा आदित्य चोप्रा आणि लेखिका तनुजा चंद्रा यांच्यासोबत 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. या चित्रपटातील एका सीनमध्येसुद्धा त्या झळकल्या होत्या. ‘एक दुजे के वास्ते’ या गाण्याच्या ओपनिंग सीनमध्ये पामेला पतीसोबत दिसल्या होत्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.