लग्नातील विधी ते रिसेप्शनची धमाल.. पियुष रानडे-सुरुची अडारकरचा हा व्हिडीओ पाहिलात का?

अभिनेता पियुष रानडेनं अभिनेत्री सुरुची अडारकरशी लग्नगाठ बांधली असून नुकताच त्याने सोशल मीडियावर लग्नाचा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पियुष आणि सुरुचीने पुण्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न केलं.

लग्नातील विधी ते रिसेप्शनची धमाल.. पियुष रानडे-सुरुची अडारकरचा हा व्हिडीओ पाहिलात का?
Piyush Ranade and Suruchi Adarkar Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 12:54 PM

मुंबई : 11 डिसेंबर 2023 | मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांनी काही दिवसांपूर्वी लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. पियुष आणि सुरुचीचं लग्न पुण्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलं. या लग्नसोहळ्याचा खास व्हिडीओ आता पियुषने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नापूर्वीची तयारी, विधी आणि त्यानंतरचं रिसेप्शन या सगळ्यांचा झलक पहायला मिळते. या दोघांच्या लग्नातील हलके-फुलके क्षणही कॅमेऱ्यात टिपण्यात आले आहेत.

लग्नाच्या विधींसाठी सुरुचीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यानंतर वरमाळा घालताना तिने गुलाबी रंगाची पैठणी नेसली होती. पारंपरिक विधींसाठी सुरुचीने केलेला लूक तिच्यावर खूपच सुंदर दिसत होता. तर रिसेप्शनसाठी तिने ऑफ शोल्डर सिल्वर रंगाचा गाऊन परिधान केला होता. लग्नाच्या काही विधी पार पडताना या व्हिडीओत पहायला मिळत आहे. वरमाळाच्या वेळी पियुष आणि सुरुचीने केलेली धमालही विशेष लक्ष वेधून घेते.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

पियुष रानडेचं हे तिसरं लग्न आहे. याआधी त्याने शाल्मली तोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र हे दोन्ही लग्न फार काळ टिकलं नाही. 2010 मध्ये पियुषने फॅशन स्टायलिस्ट शाल्मली तोळ्येशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. 2014 मध्ये पियुषने शाल्मलीला घटस्फोट दिला. त्यानंतर पियुषने जानेवारी 2017 मध्ये अभिनेत्री मयुरी वाघशी दुसरं लग्न केलं. ‘अस्मिता’ या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर पियुष आणि मयुरीने लग्नाचा निर्णय घेतला होता.

पियुषच्या दुसऱ्या लग्नातही समस्या निर्माण झाल्या. लग्नाच्या काही महिन्यांतच मयुरी आणि पियुषने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मयुरीला घटस्फोट दिल्यानंतर पियुषचं नाव मीरा सारंगसोबतही जोडलं गेलं होतं. आता अखेर त्याने अभिनेत्री सुरुची अडारकरसोबत तिसरं लग्न केलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.