News9 Global Summit: शाहरुख खान आणि भारतीय चित्रपटांबद्दल काय विचार करतात जर्मन? ग्लोबल समिटमध्ये सांगितले…
News9 Global Summit Germany: देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटमध्ये भारतीय चित्रपटांवर चर्चा झाली. यावेळी ऑलिव्हर मॅनने शाहरुख खानचा उल्लेख केला. तसेच या 'स्लमडॉग मिलेनियर'चे उत्कृष्ट चित्रपट म्हणून वर्णन केले.
News9 ग्लोबल समिट गुरुवारपासून सुरु झाला आहे. हा महासमिट सध्या जर्मनी आणि भारतात सर्वांचेच लक्ष वेधत आहे. या समिटमध्ये भारतीय चित्रपटांबद्दल एक चर्चासत्र ठेवण्यात आले आहे. त्यात Wurttemberg Film Oce चे बोर्ड चेअरमन ऑलिव्हर मॅन आणि Constantin Film AG चे मॅनेजिंग डायरेक्टर फरेडरिक रॅडमॅन यांनी भारतीय चित्रपटांबद्दल आपली भूमिका मांडली.
चर्चासत्रात शाहरुख खान याचा उल्लेख करत ऑलिव्हर मॅन म्हणतात, जर्मनीत शाहरुख खानला ओळखणारे अनेक लोक आहेत. शाहरुखचे अनेक मित्र जर्मनीत आहे. जास्तीत जास्त इंडियन स्टारला या ठिकाणी आणावे आणि जर्मनीतील युवकांसोबत त्यांची चर्चा घडवून आणावी. भारतीय चित्रपटांचे कौतूक करत मान म्हणाले, भारतीय चित्रपट जर्मनीत लोकप्रिय आहेत. जर्मनीतील चित्रपटप्रेमी इरफान खान याला ओळखत नव्हते. परंतु जर्मनीत इरफान याचा मुलगा बाबिल खान याचे जोरात स्वागत करण्यात आले.
फरेडपिक रॅडमॅन यांनी म्हटले की, भारत एका खास देश आहे. भारतात जेव्हा चित्रपटाच्या नायकाची पडद्यावर एन्ट्री होते, तेव्हा लोक टाळ्या वाजवतात, असे आम्ही पाहिले आहे. परंतु जर्मनीत असे होत नाही. ‘स्लम डॉग मिलेनियर’सारखे चित्रपट ह्रदयाला भिडून जातात, असे त्यांनी म्हटले.
"People tend to watch or consume films from places they know, language-wise, culture-wise and even religion-wise," says Friedrich Radmann Managing Director, Constantin Film AG@Bhardwajmeha @krishnaksays #IndiaGermany #News9GlobalSummit #News9GlobalSummitGermany #TV9Network pic.twitter.com/c2trkgwVPi
— News9 (@News9Tweets) November 21, 2024
भारतीय अन् जर्मन चित्रपटातील फरक
भारतीय चित्रपट भारतातील संस्कृती दाखवत असल्याचे रॅडमॅन यांनी म्हटले. ते म्हणाले, भारतीय चित्रपटात गाणे असतात. म्हणजे भारतात संगीतला किती महत्व आहे, ती दिसते. जर्मनीतील चित्रपटांमध्ये गाणी नसतात. दोन्ही देशातील कथा दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. भारतीय चित्रपटांनी मोठ्या पातळीवर जाण्याचा विचार केला पाहिजे. Tibetan ब्लू एडवाइजरी सर्व्हिसचे फाउंडर Jay Frankovich यांनी म्हटले की, भारतात कंटेंटला महत्व आहे. दिग्गदर्शन कंटेटसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात.
"India is promoting content & putting money behind content. And they are putting money behind platforms delivering that content," says Jay Frankovich, Founder, Tibetan Blue Advisory Services@Bhardwajmeha @krishnaksays #IndiaGermany #News9GlobalSummit #News9GlobalSummitGermany pic.twitter.com/UIEFiqELo6
— News9 (@News9Tweets) November 21, 2024
देशाच्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही पहिल्या दिवशी न्यूज ग्लोबल समिटमध्ये भाग घेतला. ‘भारत आणि जर्मनी: शाश्वत विकासासाठी रोडमॅप’ या विषयावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, VfB स्टुटगार्टचे मुख्य विपणन आणि विक्री अधिकारी रुवेन कॅस्पर आणि इतर अनेक बड्या व्यक्तींनी या समिटला हजेरी लावली.