‘तू अंबानींचा मुलगा आहेस की भिकाऱ्याचा…’, अनंत असं का बोलला की नीता आणि मुकेश अंबानी यांना हसू आवरलं नाही

अंबानी कुटुंबातील अनेक गोष्टी चर्चेत... मुकेश आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत असं का म्हणाला? ज्यामुळे दोघांना आवरलं नाही हसू....

'तू अंबानींचा मुलगा आहेस की भिकाऱ्याचा...', अनंत असं का बोलला की नीता आणि मुकेश अंबानी यांना हसू आवरलं नाही
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 1:21 PM

मुंबई : भारतातील सर्वात प्रभावशाली महिला आणि जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नीता अंबानी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. शिवाय धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलची जबाबदारी देखील नीता यांच्या खांद्यावर आहे. नीता अंबानी कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. शिवाय त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात. नीता यांना तीन मुलं आहेत. त्यांच्या दोन मुलांची नावे आकाश आणि अनंत अंबानी असून मुलीचं नाव ईशा अंबानी आहे.

नुकताच एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत नीता अंबानी यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. नीता अंबानी म्हणाल्या, ‘जेव्हा माझी मुलं लहान होती, तेव्हा दर शुक्रवारी शाळेच्या कॅन्टिनमध्ये जेवण करण्यासाठी मी त्यांना ५ रुपये द्यायची. एक दिवस माझा लहान मुलगा अनंत माझ्या जवळ आला मला म्हणाला मला ५ रुपये नाही त, १० रुपये हवे आहेत..’

‘मी त्याला विचारलं का हवे आहेत, १० रुपये? त्याला शाळेत मुलं चिडवायचे आणि म्हणायचे,  तू कायम ५ रुपये घेवून खाण्यासाठी काहीतरी खरेदी करतो. तू  अंबानींचा मुलगा आहेस की भिकाऱ्याचा… अनंत असं म्हणाल्या नंतर मला आणि मुकेश अंबानी यांनी हसू आवरलं नाही…’

हे सुद्धा वाचा

नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी म्हणाल्या, ‘जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा आईने पूर्ण लक्ष आमच्यावर दिलं. आम्ही ५ वर्षांचे होईपर्यंत आई आमच्यासोबत होती. त्यानंतर आईने काम करण्यास सुरुवात केली. पण ती कायम कठोर आई प्रमाणे आम्हाला वागवायची.’

nita ambani

 

ईशा अंबानी पुढे म्हणाल्या, ‘मला आठवत आहे, जेव्हा माझं आईसोबत भांडण व्हायचं, तेव्हा कायम आम्ही बाबांना बोलवायचो त्यानंतर आमची भांडणं मिटायची… कधी शाळेत जायची इच्छा नसायची तर बाबा म्हणायचे नका जावू. पण आई नेहमी सांगायची वेळेत खायचं, कष्ट करायचे आणि खेळणं देखील तितकच महत्त्वाचं आहे…’

नीता अंबानी यांच्या दोन मुलांचं लग्न झालं आहे. आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांचं लग्न झालं आहे. तर अंबानी कुटुंबातील लहान मुलगा म्हणजे अनंत यांचं लवकरच राधिका मर्चेंट यांच्यासोबत लग्न होणार आहे. तर अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका मेहता दुसऱ्यांदा आई होणार आहेत. तर ईशा अंबानी यांना देखील जुळी मुलं आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.