Nita Ambani | ‘आजीच राहा, आई होवू नकोस…’ जेव्हा नीता अंबानी यांना मुलगा असं म्हणतो…

'घरो घरी मतीच्या चुली...', अंबानी यांच्या घरात देखील चिमुकल्यांमुळे उडतात खटके.... यावर नीता अंबानी म्हणतात, 'मला आता फक्त...', सध्या सर्वत्र नीता यांच्या आजीच्या भूमिकेची चर्चा

Nita Ambani | 'आजीच राहा, आई होवू नकोस...' जेव्हा नीता अंबानी यांना मुलगा असं म्हणतो...
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 12:34 PM

मुंबई : भारतातील सर्वात प्रभावशाली महिला आणि जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नीता अंबानी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. शिवाय धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलची जबाबदारी देखील नीता यांच्या खांद्यावर आहे. नीता अंबानी कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये नीता अंबानी यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. नीता अंबानी यांनी उद्योजिका, मुलगी, पत्नी, आई.. या भूमिका पार पाडल्या… आता नीता अंबानी जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे आजीच्या भूमिकेत आहेत. नीता अंबानी आता कुटुंबातील तीन चिमुकले पृथ्‍वी, कृष्‍णा आणि आदिया यांच्या आजी आहे..

एका मॅगझिनच्या मुलाखतीत नीता अंबानी यांनी आजीच्या भूमिकेत असल्यानंतर येणाऱ्या अनुभवांबद्दल वक्तव्य केलं आहे.. मुलाखतीत नीता अंबानी यांनी सांगितलं की, मुलगा आकाश अंबानी सतत त्यांना सांगतो, ‘तू आता आजी आहेस, तर आई होवू नको.. मुलांवर आजी म्हणून प्रेम कर…’ शिवाय, नीता अंबानी म्हणाल्या, ‘मला आता माझ्या मुलांना त्यांचं मुलांचा सांभाळ करण्यासाठी स्पेस दिली पाहिजे… मला त्यांच्यावर आई म्हणून नाही तर, आता आजी म्हणून प्रेम करायचं आहे..’

पुढे नीता अंबानी म्हणाल्या, ‘मला आता नातवंडांना धाकात नाही ठेवायला पाहिजे.. हे त्यांच्या पालकांचं काम आहे… मला माझ्या मुलांच्या वेळेची खूप काळजी वाटायची. आजी म्हणून माझं काम फक्त मुलांना अपार प्रेम देणं आहे. मुलं कायम मोठ्यांचं अनुकरण करत असतात. मला वाटतं की आजी या नात्याने घरातील चिमुकल्यांना मूल्ये शिकवणे ही माझी जबाबदारी आहे.’ असं देखील नीता अंबानी म्हणाल्या..

हे सुद्धा वाचा

मुलाखतीत नीता यांनी त्यांच्या आजी – आजोबांसोबत असलेल्या आठवणी देखील ताज्या केल्या… नीता म्हणाल्या, ‘मी एकत्र कुटुंबात राहिली आहे.. माझे आजोबा फ्रेंच प्रोफेसर होते. आणि ते बिर्लांसाठी काम करायचे.. माझी आजी देखील कठोर आणि शिस्तप्रिय होती…’ सध्या सर्वत्र नीता अंबानी आणि त्यांच्या आजीच्या भूमिकेची चर्चा रंगत आहे..

नीता अंबानी यांच्या दोन मुलांचं लग्न झालं आहे. आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांचं लग्न झालं आहे. तर अंबानी कुटुंबातील लहान मुलगा म्हणजे अनंत यांचं लवकरच राधिका मर्चेंट यांच्यासोबत लग्न होणार आहे. तर अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका मेहता दुसऱ्यांदा आई होणार आहेत. तर ईशा अंबानी यांना देखील जुळी मुलं आहेत.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....