Nita Ambani खासगी मेकअप आर्टिस्टला देतात एवढं मानधन; आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
निता अंबानी जगतात प्रचंड रॉयल आयुष्य; त्यांची प्रत्येक वस्तू असते प्रचंड महागडी, खासगी मेकअप आर्टिस्टसाठी मोजतात मोठी रक्कम.... कोण आहे नीता अंबानी यांचा कअप आर्टिस्ट?
Nita Ambani Personal Makeup Artist : देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या कुटुंबाची चर्चा कायम सर्वत्र रंगलेली असते. अंबानी कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबाची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. एवढंच नाही तर, मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी प्रचंड रॉयल आयुष्य जगतात. त्यांच्या प्रत्येक वस्तू प्रचंड महागडी असते. नीता अंबानी त्यांच्या प्रत्येक आवडीच्या वस्तूसाठी मोठी रक्कम मोजतात. शिवाय नीता अंबानी प्रत्येक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसतात. पण यासाठी खरी मेहनत असते ती म्हणजी नीता अंबानी यांच्या खासगी मेकअप आर्टिस्टची. ज्यासाठी नीता अंबानी प्रचंड खर्च करतात.
नीता अंबानी ज्याप्रमाणे रॉयल आयुष्य जगतात, त्याचप्रमाणे त्या दिसतात देखील प्रचंड रॉयल. आज आपण जाणून घेवून त्यांच्या रॉयल दिसण्यामागे कोणाची मेहनत असते. नीता अंबानी यांचा खासगी मेकअप आर्टिस्ट प्रत्येक कार्यक्रमात नीता यांचा मेकअप करतो. ज्यामुळे त्या प्रचंड सुंदर दिसतात. शिवाय ईशा अंबानी आणि श्लोका मेहता – अंबानी देखील नीता यांच्या खासगी मेकअप आर्टिस्टकडून मेकअप करुन घेतात.
ही व्यक्ती फक्त अंबानी कुटुंबाच्या महिलांचा नाही तर, अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रींचा मेकअप केल्यानंतर चर्चेत आला आहे. या मेकअप आर्टिस्टने ‘हम आपके हैं कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो न हो’, ‘मोहब्बते’, ‘माय नेम इज खान’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘डॉन’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘गुड न्यूज’, ‘अंग्रेजी मीडियम’ यांसारख्या सिनेमांमधील अभिनेत्रींचं मेकअप केलं आहे.
या प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टचं नाव आहे मिकी कॉन्ट्रॅक्टर (Mickey Contractor). मिकी यांनी अनेक अभिनेत्रींचं मेकअप केलं आहे. ज्यामध्ये करीना कपूर, दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा यांसाख्या अभिनेत्रींचं देखील मेकअप केलं आहे. तर मिकी कॉन्ट्रक्टर नीता अंबानी यांचे खासगी मेकअर आर्टिस्ट आहेत.
मिकी कॉन्ट्रॅक्टर मुंबईतील एका कार्यक्रमासाठी ७५ हजार रुपये घेतात, तर दुसऱ्या ठिकाणी जावून मेकअप करण्याचे तब्बल एक लाख रुपये घेतात. महत्त्वाचं म्हणजे, दिग्गज अभिनेत्री हेलन यांनी मिकी यांना मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रेरणा दिली. मिकी यांनी स्वतःच्या स्ट्रगलिंग डेजमध्ये हेलन यांच्या हेयर ड्रेसर म्हणून काम पाहिलं.
त्यावेळी मिकी मुंबई येथील फेमस टोक्यो ब्यूटी पॉर्लरमध्ये हेयर ड्रेसर म्हणून काम करत होते. स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने मिकी कॉन्ट्रॅक्टर (Mickey Contractor) बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट झाले. आज त्यांची बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळख आहे.