धक्कादायक ! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवलं

सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे.

धक्कादायक ! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवलं
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 10:32 AM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे.नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांच्या निधनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नितीन देसाई यांनी स्वतःचे जीवन संपवल्यानंतर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

नितीन देसाई यांनी कोणतं पत्र लिहिलं आहे की नाही याची चौकशी पोलिस करत आहेत. कलाविश्वातील अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. कलाविश्वातील दिग्गज व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

नितीन देसाई यांनी स्वतः उभारलेल्या एन.डी. स्टुडिओमध्ये शेवटचा श्वास घेतला आहे. नितीन देसाई यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे सिनेविश्वाचं मोठं नुकसान झासं आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ पासून त्यांनी चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

अनेक सिनेमांमध्ये मोलाची भूमिता साकारलेल्या नितीन यांनी स्वतःचं जीवन संपलं आहे. पोलीस घटनास्थळी पोहोले असून अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. प्रथम मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या निधनामागचं कारण समजू शकेल. अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, पोलिसांचा तपास सुरु आहे.

‘लगान’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ नितीन देसाई यांनी कलाविश्वात काम केलं आहे. अशात त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....