BIG BREAKING | नितीन देसाई यांच्या पत्नीचा पोलिसांकडे धक्कादायक जबाब, खरा गुन्हेगार कोण?

"2023 च्या मार्च महिन्यामध्ये घरामध्ये फक्त आम्ही दोघेच असताना माझे पती माझ्यासमोर रडले आणि हे लोक माझ्या स्वप्नातील स्टुडिओ गिळंकृत करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे मला जीवन जगणे असह्य झाले आहे, असं त्यांनी बोलून दाखवलं होतं", असं नेहा आपल्या जबाबात म्हणाल्या.

BIG BREAKING | नितीन देसाई यांच्या पत्नीचा पोलिसांकडे धक्कादायक जबाब, खरा गुन्हेगार कोण?
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 11:52 PM

मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शन नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी रायगड पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. या जबाबात त्यांनी एडलवाईज कंपनीवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. नेहा देसाई आपल्या जबाबात नेमकं काय-काय म्हणाल्या आहेत, याबाबतची एक्सक्लुझिव माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. नेहा देसाई यांनी आपल्या जबाबात एनडी स्टुडिओच्या जन्मापासून ते नितीन देसाई यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयापर्यंतच्या विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे. एडलवाईज कंपनीने कशापद्धतीने कर्जासाठी ऑफर दिली नंतर कशाप्रकारे एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले, याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.

“2004 साली कर्जतच्या हातनोली नाका येथे एनडी स्टुडिओची स्थापना केल्यानंतर स्टुडिओच्या कामकाजासाठी आम्ही सुरुवातीला अडीच लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड आम्ही मुदतीत केली आहे. त्यानंतर आम्ही स्टुडिओच्या कामाकरता आवश्यकतेनुसार कर्ज घेतले असून त्यांची देखील मुदतीत परतफेड केलेली आहे. त्यामुळे माझे पती नितीन देसाई यांचा कर्ज घेऊन फसवण्याचा कधीच हेतू नव्हता”, असं नेहा देसाई यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

“माझे पती एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक होते. त्यांच्याकडे असलेले कामाची गुणवत्ता, कौशल्य पाहून सन 2016 मध्ये ईसीएल फायनान्स एडलवाईज ग्रुप या कंपनीने आम्हाला कर्जाची ऑफर दिली. एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांनी माझे पती नितीन देसाई यांना भेटून स्टुडिओमध्ये गुंतवणूक करून आपण स्टुडिओमध्ये अधिक वेगवेगळ्या प्रकारे संकल्पना डेव्हलप करू असे गोड बोलून, मोठी स्वप्न दाखवून तसा प्रस्ताव दिला, असं नेहा देसाई यांनी जबाबात म्हटलं आहे.

“2016 साली 150 कोटी रुपये तर 2018 साली 35 कोटी रुपयांच कर्ज दिलं. हे कर्ज घेताना एनडी स्टुडिओची जमीन तारण म्हणून ठेवण्यात आलेली होती. आम्ही कर्जाचे हप्ते मुदतीत भरत असताना देखील एप्रिल 2019 महिन्यामध्ये एडलवाईज कंपनीने माझे पती यांना आगाऊ सहा महिन्याचं म्हणजेच मे 2019 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत हप्त्यांचे पैसे भरण्याकरता दबाव टाकला. त्यामुळे त्या प्रेशरमध्ये नितीन देसाई यांनी हिरानंदानी पवई येथील आमच्या मालकीच ऑफिस विकून फायनान्स कंपनीच्या अधिकारी यांनी मागणी केल्याप्रमाणे सहा महिन्यांचा हप्ते भरले होते”, असं नेहा देसाई यांनी सांगितलं.

“मार्च 2020 मध्ये कोविडचं संकट आलं आणि त्यामुळे निर्बंधामुळे स्टुडिओ मधलं काम सुद्धा बंद झालं. स्टुडिओ मधील काम बंद पडल्यामुळे एडलवाईज कंपनीला कर्जाचे परतफेडचे हप्ते देण्यास थोडासा विलंब होऊ लागला. तर अशा परिस्थितीत सुद्धा ईसीएल कंपनीला हप्ते भरण्यासाठी नितीन देसाई यांनी तयारी दाखवली होती. मात्र इसीएल कंपनीकडून कर्जाचे हप्ते वेळेत भरण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात होता”, असा आरोप नेहा देसाई यांनी जबाबात केला आहे.

“यानंतरच नितीन देसाई यांनी वन टाइम सेटलमेंटचा प्रस्ताव ईसीएल कंपनीकडे दिला होता. या प्रस्तावावरती ईसीएल कंपनीने आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हो किंवा नाही हे न कळवता निव्वळ वेळ काढूपणा केला. वन टाइम सेटलमेंट करू, असं आश्वासन देऊन कित्येक महिने फक्त चालढकल केली. कर्जाच्या व्याजाची रक्कम वाढत गेली आणि त्यानंतर ही रक्कम मोठी झाल्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता एनसीएलटी कोर्टामध्ये ईसीएल कंपनीने धाव घेतली”, असं नेहा जबाबात म्हणाल्या आहेत.

“मधल्या काळात ईसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी नितीन देसाई यांच्या अनेक बैठका झाल्या. देसाई हे त्यांच्या पत्नीसह अनेकदा त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. शिवाय अनेकदा फोन करून सुद्धा अधिकारी त्याला उत्तर देत नव्हते. या सगळ्यामुळे नितीन देसाई प्रचंड मानसिक तणावात होते”, असं त्यांच्या पत्नीने सांगितलं.

“काही कंपन्या स्टुडिओमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असताना सुद्धा म्हणावं तसं सहकार्य एसीएल कंपनीने केलं नसल्याचा आरोप देसाई कुटुंबीयांनी केलाय. स्मित शहा, केयूर मेहता, रेषेश शहा आणि आर के बंसल हे फक्त गोड बोलून आश्वासन देत होते व दुसऱ्या बाजूने कर्ज परतफेडीसाठी कारवाई करून प्रेशर आणत होते. त्यांच्या या अशा खोट्या आणि लबाडीच्या वागण्यामुळे माझे पती मानसिक दडपणाखाली येत होते”, असं नेहा देसाई यांनी सांगितलं.

“माझे पती यांच्यावरती असलेल्या मानसिक दडपणामुळे ते घरामध्ये कोणाशी काही न बोलणे गप्प गप्प राहत होते किंवा कधीही चिडचिडेपणा करीत होते. 2023 च्या मार्च महिन्यामध्ये घरामध्ये फक्त आम्ही दोघेच असताना माझे पती माझ्यासमोर रडले आणि हे लोक माझ्या स्वप्नातील स्टुडिओ गिळंकृत करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे मला जीवन जगणे असह्य झाले आहे, असं त्यांनी बोलून दाखवलं होतं”, असं नेहा आपल्या जबाबात म्हणाल्या.

नेहा देसाई आपल्या जबाबात आणखी काय-काय म्हणाल्या?

“मी माझ्या पतीला वारंवार धीर देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र एडलवाईज कंपनीकडून कोणत्याही पद्धतीचा सहकार्य आम्हाला आतापर्यंत झालं नाही. या दरम्यान 25 जुलैला एनसीएलटी कोर्टाने संबंधित निर्णय देऊन एन डी स्टुडिओ आर्ट्स ही कंपनी दिवाळीखोर म्हणून घोषित केली आणि त्यानंतर प्रशासक म्हणून जितेंद्र कोठारी यांची नियुक्ती केली.”

“जितेंद्र कोठारी हे प्रशासक असताना सुद्धा कंपनीच्या सांगण्यानुसार काम करत होते. लागलीच 28 जुलै रोजी त्यांनी कंपनीत मेल करून कागदपत्रांची मागणी करायला सुरुवात केली. 29 जुलैला मोहरमची सुट्टी असताना सुद्धा जितेंद्र कोठारी हे आपल्या कंपनीतल्या काही लोकांना फोन करून मी खाजगी बाउन्सर घेऊन येत आहे आणि स्टुडिओचा ताबा घेणार आहे असं सांगत होते.”

“हे सगळं पाहिल्यानंतर नितीन देसाई प्रचंड तणावाखाली गेले होते. स्टुडिओ आणि स्टुडिओच्या जागेवर असणारा कला मंच गिळंकोट करून त्या जागेवर खाजगी व्यावसायिक बांधकाम करण्याचा त्यांचा कुटील हेतू आहे हे जवळपास स्पष्ट झालं होतं. तसेच फायनान्स कंपनीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे त्यांचे सुरू असलेले व्यावसायिक प्रोजेक्ट बंद पडत असून नवीन प्रोजेक्ट येण्यास देखील अडचणी येत असून ते देखील त्यांच्या नियमित कामावर लक्ष देऊ शकत नाहीत. या सर्व कारणामुळे सुमारे 100 कोटी रुपयांची आर्थिक नुकसान देखील झाले असल्याचे माझे पती यांनी मला सांगितले होते.”

“माझे पती फायनान्स कंपनीचे कर्ज फेडण्याची तयारी दाखवत असून सुद्धा फायनान्स कंपनीचे केवळ मेहता, रशिद शहा, स्मित शहा कंपनीचे आर के बंसल आणि प्रशासक जितेंद्र कोठारी यांनी स्टुडिओच्या कर्जाच्या वसुली करता माझे पती यांना प्रचंड मानसिक त्रास दिला या मानसिक त्रासाला कंटाळून माझे पती यांची इच्छा नसतानाही त्यांनी आत्महत्या करण्यास भाग पाडले म्हणून वरील इसमान विरोधात माझी कायदेशीर तक्रार आहे.”

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.