Nitin Desai | ‘तो’ प्रस्ताव दिला नसता तर आज नितीन देसाई जिवंत असते?, देसाई यांच्या पत्नीच्या तक्रारीचा अर्थ काय?

'गोड बोलून, मोठी स्वप्न दाखवून तो प्रस्ताव दिला आणि...', नितीन देसाई यांच्या निधनानंतर मोठं सत्य अखेर समोर आलंच... नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ

Nitin Desai | 'तो' प्रस्ताव दिला नसता तर आज नितीन देसाई जिवंत असते?, देसाई यांच्या पत्नीच्या तक्रारीचा अर्थ काय?
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 11:39 AM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. आर्थिक विवंचनेमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे. काही वर्षांपूर्वी नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनीकडून १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. १८० कोटींचं कर्ज जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. आता याप्रकरणी नितीन देसाई यांच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे. आता नितीन देसाई मृ्त्यू प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे.

नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. नितीन देसाई यांच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर पाच जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

‘तो’ प्रस्ताव दिला नसता तर आज नितीन देसाई जिवंत असते? नितीन देसाई यांनी घेतलेल्या कर्जाबद्दल त्यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी जबाबात मोठा खुलासा केला आहे. नितीन देसाई सुरुवातीला फक्त अडीच लाखांचं कर्ज घेत एनडी स्टुडिओची स्थापना केली. एवढंच नाही तर, कर्जाची परतफेड नितीन देसाई यांनी मुदतीत केली… असं नेहा देसाई म्हणाल्या…

हे सुद्धा वाचा

एडलवाईज कंपनीने नितीन यांना दिलेल्या एका प्रस्तावाबद्दल नेहा देसाई म्हणाल्या, ‘माझे पती एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक होते. त्यांच्याकडे असलेले कामाची गुणवत्ता, कौशल्य पाहून सन २०१६ मध्ये ईसीएल फायनान्स एडलवाईज ग्रुप या कंपनीने आम्हाला कर्जाची ऑफर दिली. गोड बोलून, मोठी स्वप्न दाखवून एका प्रस्ताव दिला, असं नेहा देसाई यांनी जबाबात म्हटलं आहे.’

नेहा देसाई पुढे म्हणाल्या, ‘एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांनी माझे पती नितीन देसाई यांना भेटून स्टुडिओमध्ये गुंतवणूक करून आपण स्टुडिओमध्ये अधिक वेगवेगळ्या प्रकारे संकल्पना डेव्हलप करू असं म्हणाले. सुरुवातील त्यांनी १५० कोटी रुपये तर २०१८ साली ३५ कोटी रुपयांच कर्ज दिलं. हे कर्ज घेताना एनडी स्टुडिओची जमीन तारण म्हणून ठेवण्यात आलेली होती.’

नितीन देसाई कर्जाचे हप्ते वेळेत भरत होते. पण कोरोनामुळे दोन वर्ष स्टुडिओचं काम बंद होतं. अशात एडलवाईज कंपनीला कर्जाचे परतफेडचे हप्ते देण्यास थोडासा विलंब होऊ लागला. इसीएल कंपनीकडून कर्जाचे हप्ते वेळेत भरण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात होता..’, असा आरोप नेहा देसाई यांनी जबाबात केला आहे. जर कंपनीने नितीन देसाई यांना प्रस्ताव दिला नसता तर, आज नितीन देसाई जिवंत असते… अशी चर्चा रंगत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.