Nivedita Saraf | निवेदिता सराफ यांना मॉलमध्ये आला अत्यंत वाईट अनुभव; म्हणाल्या ‘सेलिब्रिटी म्हणून नाही तर..’

अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंटमध्ये लिहिलं, 'खरंय'. तर काहींनी त्यांच्यासोबतही असंच काहीसं घडल्याचं सांगितलं. काही नेटकऱ्यांनी निवेदिता यांना संबंधित ब्रँडवर बहिष्कार टाकण्याचाही सल्ला दिला.

Nivedita Saraf | निवेदिता सराफ यांना मॉलमध्ये आला अत्यंत वाईट अनुभव; म्हणाल्या 'सेलिब्रिटी म्हणून नाही तर..'
Nivedita SarafImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 12:09 PM

मुंबई : अभिनेत्री निवेदिता सराफ यांना नुकताच एका मॉलमध्ये वाईट अनुभव आला. हा अनुभव त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित चाहत्यांना सांगितला. त्याचसोबत एक सेलिब्रिटी म्हणून नाही तर सर्वसामान्य ग्राहक म्हणून योग्य वागणूक मिळणं हा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. निवेदिता यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत मॉलमधील कर्मचाऱ्यांविरोधात राग व्यक्त केला आहे. नुकत्याच त्या मालाडमधल्या एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. मात्र मॉलमधील एका कपड्यांच्या दुकानात त्यांना योग्य वागणूक दिली गेली नाही. म्हणूनच त्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याविरोधात तक्रार केली आहे.

निवेदिता सराफ यांची पोस्ट-

‘मी मालाडच्या इन्फिनिटी मॉलमधील मॅक्स स्टोअरमध्ये गेले होते. त्या स्टोअरमधील कर्मचाऱ्यांकडून अत्यंत वाईट वागणूक मिळाली. तिथला माझा अनुभव अजिबात चांगला नव्हता. तुम्ही काय खरेदी करत आहात याकडे त्यांच्या कर्मचाऱ्यांचं लक्षच नव्हतं. तिथे मदतीसाठीही कोणी पुढे येत नव्हतं. एक मुलगी आली आणि तिने फक्त दुसऱ्या कर्मचाऱ्याला सांगितलं की तिच्याकडे वेळ नाही. ती तिथून थेट निघून गेली. जेव्हा दुसऱ्या कर्मचाऱ्याने मला ओळखलं तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मॅनेजरला बोलावलं’, असा अनुभव त्यांनी सांगितला.

हे सुद्धा वाचा

याविषयी त्यांनी पुढे लिहिलं, ‘मी सेलिब्रिटी आहे म्हणून मला चांगली वागणूक नकोय पण सर्वसामान्य ग्राहक म्हणून मला योग्य वागणूक आहे. स्टोअरमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा तो हक्क आहे.’ निवेदिता यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत स्टोअरविरोधात राग व्यक्त केला.

अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंटमध्ये लिहिलं, ‘खरंय’. तर काहींनी त्यांच्यासोबतही असंच काहीसं घडल्याचं सांगितलं. काही नेटकऱ्यांनी निवेदिता यांना संबंधित ब्रँडवर बहिष्कार टाकण्याचाही सल्ला दिला. निवेदिता सराफ या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. मालिकेत काम करतानाच त्या स्वत:च्या युट्यूब चॅनलसाठी विविध व्हिडीओ शूट करत असतात. याशिवाय त्यांचा साड्यांचाही व्यवसाय आहे. त्यांच्या ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘भाग्य दिले तू मला’ या मालिका चांगल्याच गाजल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.