Nora Fatehi ला सर्वांसमोर नको तसा डान्स करणं पडलं महागात, अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

Nora Fatehi : 'बॉलिवूडमधील उच्च शिक्षित लोकं...', नोरा फतेही हिच्या नको त्या डान्सवर अनेकांकडून संताप व्यक्त... 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल..., नोरा फतेही सध्या वादाच्या भोवऱ्यात...

Nora Fatehi ला सर्वांसमोर नको तसा डान्स करणं पडलं महागात, अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 10:44 AM

मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिला तिच्या डान्समुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. पण आता अभिनेत्री तिच्या हटके डान्समुळेच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या सोशल मीडियावर नोरा हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. नोरा फतेही हिचा ‘झलक दिखला जा 10’ सीझनमध्ये जजच्या भूमिकेत होती. नुकताच, अभिनेत्री डान्स रिऍलिटी शो ‘डान्स प्लस प्रो’मध्ये पोहोचली होती.

शोमध्ये नोरा हिने हटके डान्स केला. नोरा हिचा डान्स केल्यानंतर, अभिनेत्री सर्व मर्यादा पार केल्या.. असा आरोप अनेकांनी केला आहे. फॅमिली शोमध्ये नोरा हिने नको त्या प्रकारे डान्स केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. सध्या नोरा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा हिची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

डान्स प्लस प्रो शोच्या स्टोजवर नोरा फतेही हिने तिच्याच ‘नाच मेरी राणी’ या गाण्यावर डान्स केला. अभिनेत्रीला तिच्या अभिनयासाठी खूप टाळ्या मिळत होत्या. दरम्यान, डान्स करताना अचानक नोराने अंगावर पाणी ओतण्यास सुरुवात केली, नोराचं असं कृत्य पाहून जजपासून प्रेक्षकांपर्यंत सगळेच आश्चर्यचकित झाले. फॅमिली शोमध्ये अशा प्रकारे डान्स करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे.

सोशल मीडियावर नोरा फतेही हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी अभिनेत्रीच्या व्हिडीओवर संताप व्यक्त करत म्हणाला, ‘ही मुंबईची टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूड… स्वतःला उच्च शिक्षिक समजतात…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘टीव्हीवर असं दाखवणं योग्य नाही… ओटीटीवर ठिक आहे..’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘नोराला असे पाहिल्यानंतर तुम्ही हैराण होणार…’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

नोरा फतेही हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आयटम सॉग्न केलं आहे. अभिनेत्रीचं प्रत्येक गाणं हीट होते. ‘दिलबर दिलबर’ गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली नोरा बॉलिवूडमधील मोठं नाव आहे. नोरा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.