सारा अली खान नाही तर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीवर शुभमन गिल फिदा; स्वत:च सांगितलं नाव

शुभमनने एका मुलाखतीत सारा अली खानचं नाव घेतलं होतं. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला त्याच्या बॉलिवूड क्रशचं नाव विचारलं तेव्हा दुसरंच नाव ऐकायला मिळालं.

सारा अली खान नाही तर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीवर शुभमन गिल फिदा; स्वत:च सांगितलं नाव
सारा अली खान नाही तर 'ही' आहे शुभमन गिलची बॉलिवूड क्रश Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 12:13 PM

मुंबई : क्रिकेटर शुभमन गिलचं नाव कधी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तर कधी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडलं गेलं. सारा अली खान आणि शुभमन यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. तेव्हापासूनच या दोघांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. मात्र या दोघांनी कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. शुभमनने एका मुलाखतीत सारा अली खानचं नाव घेतलं होतं. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला त्याच्या बॉलिवूड क्रशचं नाव विचारलं तेव्हा दुसरंच नाव ऐकायला मिळालं.

बॉलिवूड अभिनेत्रींपैकी तुझा क्रश कोणावर आहे, असा प्रश्न शुभमनला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. सुरुवातीला शुभमन त्याचं उत्तर देण्यासाठी कचरत होता. मात्र अखेर त्याने अशा अभिनेत्रीचं नाव घेतलं, जिच्यावर संपूर्ण देश फिदा आहे. ‘नॅशनल क्रश’ आणि ‘एक्स्प्रेशन क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना हीच माझी क्रश असल्याचं शुभमनने सांगितलं. शुभमनच्या तोंडून रश्मिकाचं नाव ऐकल्यानंतर सर्वजण थक्क झाले. कारण याआधी एका मुलाखतीत त्याने सारा अली खानला डेट करत असल्याची हिंट दिली होती.

हे सुद्धा वाचा

‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनने डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. तुझ्या मते बॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री कोणती, असा प्रश्न त्याला या शोमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शुभमनने लगेच साराचं नाव घेतलं होतं.

साराचं नाव घेतल्यानंतर त्याला डेटिंगविषयी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. तू सारा अली खानला डेट करतोयस का, असं शुभमनला विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “कदाचित”. ‘सारा का सारा सच बोलो’, असं सूत्रसंचालकाने म्हटल्यावर शुभमनच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. “सारा दा सारा सच बोल दिया.. कदाचित हो, कदाचित नाही”, असं त्याने पुढे सांगितलं होतं.

सर्वांत आधी सारा आणि शुभमन गिल एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले. या दोघांना एकत्र पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर एका एअरपोर्टवर दोघं पुन्हा एकदा एकत्र दिसले. मात्र या डेटिंगविषयी सारा अली खानने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.