AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिटनेससाठी नव्हे तर ‘या’ खास कारणामुळे विवाहस्थळापर्यंत धावत आला आमिर खानचा जावई

नुपूर त्याच्या घरापासून विवाहस्थळापर्यंत जॉगिंग करत आला होता. वधू हा घोड्यावर बसून वरात घेऊन लग्नमंडपात येतो. मात्र यावेळी असं काहीच झालं नव्हतं. त्याच स्लीव्हलेस टी-शर्ट आणि हाफ पँटवर तो नोंदणी पद्धतीने लग्नासाठी स्टेजवर पोहोचला होता. त्यामुळे हे लग्न लक्षवेधी ठरलं होतं.

फिटनेससाठी नव्हे तर 'या' खास कारणामुळे विवाहस्थळापर्यंत धावत आला आमिर खानचा जावई
Nupur ShikhareImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 08, 2024 | 3:23 PM
Share

मुंबई : 8 जानेवारी 2024 | अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने बुधवारी 3 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्न केलं. मुंबईतल्या ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोंदणी पद्धतीने हे लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्याती लक्षवेधी गोष्ट ठरली ती म्हणजे नुपूरची वरात. ही काही साधीसुधी वरात नव्हती. नुपूर कोणत्याही गाडीत किंवा घोड्यावर विवाहस्थळी पोहोचला नव्हता. तर तो चक्क 8 किलोमीटर धावत त्याठिकाणी पोहोचला होता. नुपूर हा फिटनेस कोच असल्याने त्याने असं काही अनोखं करण्याचा विचार केला असावा, असं अनेकांना वाटलं होतं. मात्र या मागचं खरं कारण त्याने आता उघड केलं आहे. लग्नाच्या व्हिडीओमध्ये नुपूरने विवाहस्थळापर्यंत धावण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

या व्हिडीओमध्ये नुपूर म्हणतो, “माझ्या घरापासून आयराच्या घरापर्यंत मी धावत जायचो. ज्या मार्गावरून मी धावत जायचो, त्या मार्गाशी माझं खास कनेक्शन आहे. त्यामुळे विवाहस्थळापर्यंत धावत जाण्यामागे एक भावनिक कारण आहे.” या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आयुष्य म्हणजे आठवणींचा सुंदर खजिना असतो. अशाच आठवणींची निर्मिती करत जा’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हे खूपच हृदयस्पर्शी आहे’, असं दुसऱ्याने लिहिलंय.

आयरा खानचा पती नुपूर शिखरे हा सेलिब्रिटी फिटनेस कोच आणि कन्सल्टंट आहे. बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी नुपूरचे क्लाएंट आहेत. यात आमिर खान आणि सुष्मिता सेन यांचाही समावेश आहे. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान आयरा तिच्या वडिलांसोबत राहत होती. त्यावेळी तिची पहिल्यांदा ओळख नुपूरशी झाली. सुरुवातीला ही ओळख आयराच्या फिटनेससाठीच झाली होती. हळहळू या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. 2021 मध्ये आयराने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली. सप्टेंबर 2021 मध्ये नुपूरने आयराला लग्नासाठी प्रपोज केलं. त्याच्या दोन महिन्यांनंतर दोघांनी साखरपुडा जाहीर केला.

आयरा आणि नुपूरच्या लग्नाला आमिर खानच्या दोन्ही पूर्वी पत्नी उपस्थित होत्या. आयरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. पहिल्या पत्नीपासून आमिरला जुनैद हा मुलगासुद्धा आहे. तोसुद्धा बहिणीच्या अत्यंत खास दिवशी त्याठिकाणी उपस्थित होता. याशिवाय आमिरची दुसरी पत्नी मुलगा आझादला घेऊन लग्नाला पोहोचली होती.

BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...