OMG 2 Box Office | ‘गदर 2’च्या स्पर्धेत अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड 2’चीही समाधानकारक कमाई

11 ऑगस्ट रोजी अक्षय कुमारचा 'OMG 2' आणि सनी देओलचा 'गदर 2' हे दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले. जर यादिवशी एकच चित्रपट प्रदर्शित झाला असता तर कमाईवर फटका बसला नसता.

OMG 2 Box Office | 'गदर 2'च्या स्पर्धेत अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड 2'चीही समाधानकारक कमाई
OMG 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 8:56 AM

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. इतकंच नव्हे तर त्यावर बंदीची मागणी केली गेली. या सर्व वादानंतर आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाशी टक्कर होऊनसुद्धा ‘OMG 2’ने समाधानकारक कमाई केली आहे. यासोबतच प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा आवडत असल्याचं दिसून येत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत. एकीकडे ‘गदर 2’ची दमदार कमाई होत असताना ‘OMG 2’नेही चांगला गल्ला जमवला आहे.

अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड 2’ने पहिल्या दिवशी 10.26 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 15.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 17.55 कोटी कमावले. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई जवळपास 43.11 कोटी रुपयांची झाली होती.

आता ‘ओह माय गॉड 2’च्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी या चित्रपटाने जवळपास 11 ते 12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे आता चार दिवसांतील कमाईचा आकडा 50 कोटींच्या वर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांत ‘OMG 2’ने 54 कोटी रुपये कमावले आहेत. हळूहळू ही कमाई 100 कोटींचा टप्पा गाठू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. 15 ऑगस्टच्या सुट्टीचाही त्याला फायदा होईल, असं म्हटलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

11 ऑगस्ट रोजी अक्षय कुमारचा ‘OMG 2’ आणि सनी देओलचा ‘गदर 2’ हे दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले. जर यादिवशी एकच चित्रपट प्रदर्शित झाला असता तर कमाईवर फटका बसला नसता. गेल्या काही महिन्यात अक्षय कुमारचे चित्रपट एकानंतर एक फ्लॉप ठरत होते. त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या.

‘गदर 2’ची बरीच क्रेझ असूनही ‘OMG 2’ला चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. चित्रपटातील काही सीन्सवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. आता अक्षय कुमारबद्दल हिंदू संघटनेनं धक्कादायक घोषणा केली आहे. उत्तरप्रदेशच्या आग्रामधील राष्ट्रीय हिंदू परिषद भारत या संघटनेनं चित्रपटातील भूमिका आणि कथा यावरून नाराजी व्यक्त केली आहे. अमित राय दिग्दर्शित ‘OMG 2’ या चित्रपटात सेक्स एज्युकेशनचा मुद्दा मांडण्यात आला आहे. त्यावरच त्यांनी आक्षेप घेतला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.