OMG 2 Review | सेक्स एज्युकेशनचा मुद्दा मांडणारा ‘OMG 2’ पहावा की पाहू नये? वाचा सविस्तर रिव्ह्यू..

'OMG'च्या लोकप्रियतेला टक्कर देऊन 'OMG 2' हा चित्रपटसुद्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवू शकेल का, असं मोठं आव्हान निर्मात्यांसमोर आहे. सुरुवातीपासून या चित्रपटाच्या मार्गात बरेच अडथळे आले. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही त्याला 'A' प्रमाणपत्र दिलं. त्यामुळे अमित राय दिग्दर्शित हा सीक्वेल नेमका कसा आहे, ते जाणून घेऊयात..

OMG 2 Review | सेक्स एज्युकेशनचा मुद्दा मांडणारा 'OMG 2' पहावा की पाहू नये? वाचा सविस्तर रिव्ह्यू..
OMG 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 11:00 AM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : अभिनेता अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा 2012 मध्ये ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुरुवातीला त्यातील काही धार्मिक गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला, मात्र कथेतील तर्कवितर्क पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला खूप पसंती दर्शवली. आता याच चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यात अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी यांची जोडी पहायला मिळतेय. ‘OMG’च्या लोकप्रियतेला टक्कर देऊन ‘OMG 2’ हा चित्रपटसुद्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवू शकेल का, असं मोठं आव्हान निर्मात्यांसमोर आहे. सुरुवातीपासून या चित्रपटाच्या मार्गात बरेच अडथळे आले. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही त्याला ‘A’ प्रमाणपत्र दिलं. त्यामुळे अमित राय दिग्दर्शित हा सीक्वेल नेमका कसा आहे, ते जाणून घेऊयात..

‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडताना त्याविषयी पडलेल्या सर्व प्रश्नांचा विसर पडतो. पहिल्या भागात दिखाऊपणावर जितका धारदार प्रहार होता, तितकाच आता या सीक्वेलमध्येही पहायला मिळतो. दोन भिन्न प्रकारच्या विचारसणींमधील समान संघर्ष ‘OMG 2’मध्ये दाखवण्यात आला आहे. फक्त फरक इतकाच आहे की पहिल्या भागात धार्मिक दिखाऊपणा आणि त्याच्या नावाखाली केला जाणारा व्यापार हा विषय दाखवण्यात आला होता. तर आता दुसऱ्या भागत लैंगिक शिक्षण या विषयावरील संकुचित विचारसरणीचा मुद्दा मांडण्यात आला आहे.

चित्रपटाची कथा-

चित्रपटात शिवभक्त कांतीशरण मुद्गल (पंकज त्रिपाठी) हे महाकाल मंदिराजवळ पूजेचं साहित्य विकणारं दुकान चालवतात. ते एका सामान्य कुटुंबातून असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. हसत-खेळत, पूजा पाठमध्ये मग्न असणारा हा छोटा मध्यमवर्गीय परिवार आहे. मात्र या कुटुंबात अचानक एकेदिवशी भूकंप येतो, जेव्हा कांतीशरण यांच्या मुलाला बेशुद्ध झाल्यानंतर त्याचे मित्र रुग्णालयात दाखल करतात.

हे सुद्धा वाचा

रुग्णालयात डॉक्टर आणि विवेकचे (कांतीशरण यांचा मुलगा) मित्र हे त्याच्या वडिलांना त्याच्या वाईट सवयीविषयी सांगतात. विवेक हस्तमैथुन करण्याच्या सवयीचा शिकार होतो. याच सवयीमुळे त्याला अखेर एके दिवशी शाळेतून काढून टाकलं जातं. मुलाला शाळेतून काढून टाकल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचीही बदनामी होते. अखेर या सर्व त्रासातून काही दिवसांच्या सुटकेसाठी संपूर्ण कुटुंबीय दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार करतात. कांतीशरणचं कुटुंब जेव्हा रेल्वे स्थानकावर पोहोचतं, तेव्हा विवेक धावत्या ट्रेनसमोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी मानव वेशातील भगवान शंकराचा दूत बनून आलेला अक्षय कुमार त्याचे प्राण वाचवतो.

या घटनेनंतर कांतीशरण यांना त्यांच्या प्रत्येक पावलावर शंकराच्या दूताची मदत मिळते. त्यांच्या मुलाचं आरोग्य आणि भविष्य खराब करण्यासाठी जे जे लोक जबाबदार आहेत, त्या सर्वांविरोधात खटला दाखल करण्याचा सल्ला दूताकडून देण्यात येतो. त्यानंतर बराच काळ कोर्ट रुम ड्रामा पहायला मिळतो आणि त्यादरम्यान नेमकं काय काय घडतं हे तुम्हाला संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर समजू शकेल.

सेक्स एज्युकेशन आणि A सर्टिफिकेटचा वाद

सरकारी नियमांना बांधिल असलेल्या सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र दिलं आहे. या संपूर्ण चित्रपटात लैंगिक शिक्षणाचा विषय मांडण्यात आला आहे आणि शालेय अभ्यासक्रमात सेक्स एज्युकेशनचा समावेश करण्यासाठी एक प्रकारची मोहीम चालवली आहे. चित्रपटात कांतीशरण कोर्टात युक्तीवाद करताना या गोष्टीवर विशेष भर देतात की जर सेक्स एज्युकेशनचा शालेय शिक्षणात समावेश केला असता तर त्यांचा मुलगा दिशाभूल करणाऱ्या प्रचार-प्रसाराला बळी पडला नसता. चित्रपटाचा हा विषय खासकरून किशोर वर्गासाठी आहे आणि सेन्सॉर बोर्डाने A प्रमाणपत्र देऊन त्याच वर्गाला चित्रपट पाहण्यापासून वंचित ठेवलं आहे.

अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन

2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘OMG’मधील कांजीलाल मेहताच्या भूमिकेतील परेश रावल यांचा वेगळा अंदाज होता. मात्र आता ‘OMG 2’मध्ये कांतीशरण मुद्गलच्या भूमिकेतील पंकज त्रिपाठी आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतात. अंधविश्वासाबद्दल परेश रावल यांचे मजेशीर तर्क उल्लेखनीय होते, तर सेक्स एज्युकेशनवर पंकज त्रिपाठी यांचा आपल्याच अंदाजातील पलटवारसुद्धा कौतुकास्पद आहे. तर शंकराचा दूत बनलेल्या अक्षय कुमारचं अभिनयसुद्धा मनोरंजक आहे. विशेषकरून तांडव आणि कार चालवत असलेल्या सीनमध्ये अक्षयने आपल्या दमदार अभिनयाने प्रभावित केलं. याशिवाय वकील कामिनी माहेश्वरीच्या भूमिकेतील यामी गौतमसुद्धा पडद्यावर प्रभावशाली वाटते.

अमित राय यांच्या दिग्दर्शनात बरीच स्पष्टता असते. आपला हेतू अत्यंत स्पष्टपणे चित्रपटात मांडण्यात ते यशस्वी ठरले आहेत. कथा, पटकथा आणि भूमिका यांना सविस्तरपणे मांडण्यात आलं आहे. कुठेच कोणत्या भूमिकेच्या प्रवाहात अडथळा येत नाही. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, अमित राय आणि राजवीर अहुजा यांनी लिहिलेल्या संवादांवर थिटएरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो.

का पहावा चित्रपट?

या चित्रपटातील संगीताला आधीच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय चित्रपटात सेक्स एज्युकेशनसंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत, ज्यांचा विचार सरकार आणि सिस्टिमने करणं गरजेचं आहे. प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट उत्तम आहे. जगात सर्वांत आधी भारतात सेक्स एज्युकेशनची सुरुवात झाली, तरी लोक त्या विषयावर चर्चा का करत नाहीत, असा सवाल यातून मांडण्यात आला आहे.

दिग्दर्शक- अमित राय कलाकार- अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, गोविंद नामदेव, अरुण गोविल, यामी गौतम, पवन मल्होत्रा, राजेंद्र काला.. रेटिंग- 4****

Non Stop LIVE Update
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.