‘जयाप्रदा यांना अटक करा आणि…’, कोर्टाचे आदेश, अभिनेत्रीच्या अडचणीत मोठी वाढ

Jaya Prada : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता...न्यायालयाच्या आदेशानंतर जयाप्रदा यांना होणार अटक, जयाप्रदा यांच्या जामीनदारांना देखील 'या' प्रकरणी बजावली नोटीस, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जयाप्रदा यांची चर्चा...

'जयाप्रदा यांना अटक करा आणि...', कोर्टाचे आदेश, अभिनेत्रीच्या अडचणीत मोठी वाढ
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 8:12 AM

नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. आता देखील कोर्टाने जयाप्रदा यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जयाप्रदा तुफान चर्चेत आल्या आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्यावर पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. याआधी देखील जयाप्रदा यांना एक दोन नाही तर चार वेळा न्यायालयात हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. पण जयाप्रदा यांच्याकडून कोणतंही उत्तर न आल्यामुळे न्यायालयाने रामपूर एसपींना पत्र लिहून जयाप्रदा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी मिळतअसलेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान न्यायालयाने जयाप्रदा यांच्या वकिलाचा युक्तिवाद फेटाळला असून अजामीनपात्र वॉरंट सुरू ठेवण्याचे आदेश दिले. महत्त्वाचं म्हणजे आता न्यायालयाने जयाप्रदा यांच्या जामीनदारांना नोटीसही बजावली आहे. याप्रकरणी पुढील तपासणी 19 डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणूक 2019 दरम्यान जयाप्रदा यांच्यावर स्वार आणि केमरी पोलीस स्टेशनमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अद्याप जयाप्रदा यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. आता लवकरच त्यांच्या जबाबाच्या आधारे पुढील सुनावणी होणार आहे. म्हणून न्यायालयाने पोलिसांना जयाप्रदा यांना अजट करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता प्रकरणी काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे नक्की प्रकरण?

2019 मध्ये जयाप्रदा यांनी भाजपच्या तिकिटावर रामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जयाप्रदा यांचा पराभव झाला. दरम्यान, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांनी 19 एप्रिल रोजी नूरपूर गावात रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही जयाप्रदा यांनी रस्त्याचं उद्घाटन केल्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

जयाप्रदा यांच्या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी रामपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयात सुरु आहे. साक्ष प्रक्रियेनंतर जयाप्रदा यांना न्यायालयात त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी अनेकदा बोलावण्यात आलं, पण अभिनेत्री हजर राहिल्या नाहीत. म्हणून न्यायालयाने जयाप्रदा यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.