भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेते कोण? टॉप १० च्या यादीत नाही सलमान खान, जाणून घ्या शाहरुखचं स्थान
भाईजानच्या चाहत्यांची संख्या कमी होतेय? भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्याच्या यादीत सलमान खान याचं नाव नाही, शाहरुख खान याचं नाव कोणत्या स्थानावर
मुंबई : बॉलिवूडमध्ये काही ठरलेल्या अभिनेत्यांच्या चाहत्यांच्या संख्या फार मोठी आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता कोण? असा प्रश्न चाहत्यांना विचारला, तर ते एखाद्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं नाव घेतील. कदाचित यामध्ये अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार आणि शाहरुख आणि आमिर खान यांचं नाव चाहत्यांच्या तोंडावर असेल. पण भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत दाक्षिणात्य अभिनेत्यांना बाजी मारली आहे. महत्त्वाची गोष्टी यादीत टॉप ५ मध्ये देखील अभिनेता सलमान आणि शाहरुख यांचं नाव नाही. भाईजानच्या चाहत्यांना निराश करणारी गोष्ट म्हणजे यादीत सलमान खान याचं नावच नाही.
भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानी साऊथ सुपरस्टार थवापती विजय याने बाजी मारली आहे. ऑरमॅक्स मीडियाने मोस्ट पॉपुलर इंडियन मेल फिल्म स्टार्स डिसेंबर 2022 ची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये विजय पहिल्या स्थानी आहे. यादीमध्ये दुसऱ्य स्थानी प्रभास आणि तिसऱ्या स्थानी ज्युनियर एनटीआर, चौथ्या स्थानावर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आहे.
Ormax Stars India Loves: Most popular male film stars in India (Dec 2022) #OrmaxSIL pic.twitter.com/RUbiJ2PUtJ
— Ormax Media (@OrmaxMedia) January 15, 2023
भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत पाचव्या स्थानी अल्लू अर्जुन आहे. केजीएफ फेम यश सहाव्या नंबरवर आहे, तर अजीत कुमार सातव्या स्थानावर आहे. सध्या भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांची यादी सर्वत्र व्हायरल होत आहे.
शाहरुख खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता गेल्या काही दिवसांपासून ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान टॉप ५ मध्ये देखील नाही. यादीत शाहरुख आठव्या स्थानी आहे.
नवव्या स्थानी राम चरण आणि १० व्या स्थानी महेश बाबू आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांसोबतच ऑरमॅक्स मीडियाने मोस्ट पॉपुलर इंडियन फिमेल फिल्म स्टार्स डिसेंबर 2022 ची याही जारी केली आहें. या यादीमध्ये देखील दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बाजी मारली आहे.
भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी सामंथा रुथ प्रभु आहे. दुसऱ्या आलिया भट्ट असून तिसऱ्या स्थानी नयनतारा आहे. चौथ्या स्थानी दीपिका पादुकोण आणि पाचव्या स्थानी काजल अग्रवाल आहे. सहाव्या स्थानी रश्मिका मंथना आणि सातव्या स्थानी कतरिना कैफ आहे. आठव्या स्थानी तृषा आहे. नवव्या आणि दहाव्या स्थानी क्रमशः तमन्ना भाटिया आणि किर्ती सुरेश आहेत.