‘मिडल फिंगर’ अन् साराचा उल्लेख.. ऑरीसोबत पलक तिवारीचे व्हॉट्सॲप चॅट्स लीक

ओरहान अवत्रमणी ऊर्फ ऑरी आणि बॉलिवूड स्टारकिड्सचं नेमकं कनेक्शन काय हे आजवर कोणालाच कळलेलं नाही. मात्र प्रत्येक स्टारकिड आणि सेलिब्रिटीसोबत ऑरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता ऑरी आणि पलक तिवारी यांच्यातील चॅट्स थेट सोशल मीडियावर लीक झाले आहेत.

'मिडल फिंगर' अन् साराचा उल्लेख.. ऑरीसोबत पलक तिवारीचे व्हॉट्सॲप चॅट्स लीक
Orry and Palak TiwariImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 8:15 AM

मुंबई : 3 जानेवारी 2024 | सोशल मीडिया सेन्सेशन ऑरी ऊर्फ ओरहान अवत्रमणी अनेकदा बॉलिवूडच्या स्टारकिड्ससोबत पार्ट्यांमध्ये दिसून येतो. प्रत्येक सेलिब्रिटीसोबत ऑरीचे फोटो पहायला मिळतात. जान्हवी कपूर, सारा अली खान, न्यासा देवगण, वीर पहाडिया, सारा तेंडुलकर यांसारख्या बऱ्याच सेलिब्रिटींसोबत त्याची मैत्री आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसोबतही ऑरी काही कार्यक्रमांमध्ये दिसला. मात्र आता या दोघांमधील व्हॉट्सॲप चॅट्स लीक झाले आहेत. या चॅट्सचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चॅटमध्ये पलकने ऑरीची माफी मागितली तर त्याने पलकला ‘मिडल फिंगर’चा इमोजी पाठवला आहे. विशेष म्हणजे यामध्ये पलकने अभिनेत्री सारा अली खानचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे या तिघांमध्ये नेमकं काय घडलंय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

व्हॉट्सॲप चॅट्समध्ये नेमकं काय?

‘ऑरी, मी पलक बोलतेय. जर तुला माफीच हवी असेल तर मी माफी मागते’, असा मेसेज पलकने ऑरीला व्हॉट्सॲपवर पाठवला. तिच्या या मेसेजचं उत्तर देताना ऑरी थेट ‘मिडल फिंगर’चा इमोजी पोस्ट करतो. त्यानंतर पलक त्याला म्हणते, ‘सारासाठी असलेल्या आदरामुळे मी तुझी माफी मागतेय.’ पलकच्या या मेसेजवर पुढे ऑरी लिहितो, ‘नाही बेब.’ तो माफी स्वीकारायला तयार नसल्याने पलक पुन्हा एकदा ‘आय ॲम सॉरी’ (मी माफी मागते) असं लिहिते. तेव्हा ऑरी तिला सुनावतो, ‘तू स्वत:साठी असलेल्या आदरामुळे माफी माग. कारण इतरांशी कसं बोलायचं हे तुला माहीत नाही.’ या चॅटमध्ये पलकचा शेवटचा मेसेज असतो, ‘मी माफी मागितली आहे.’

हे सुद्धा वाचा

ऑरी आणि पलक यांच्यामधील हे चॅट्स कितपत खरे आहेत, याबद्दल कोणतीच माहिती अद्याप समोर आली नाही. ऑरी किंवा पलकने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लीक झालेल्या या चॅटच्या स्क्रीनशॉटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हेच चॅट्स जर जान्हवी, खुशी, सारा, अनन्याचे असते तर ऑरीने लीक केले असते का’, असं एकाने म्हटलंय. तर ‘सारा, ऑरी आणि पलक यांच्यात काहीतरी मोठं भांडण झालेलं दिसतंय’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

पलक तिवारीने गेल्या वर्षी सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्याआधी ती ‘बिजली बिजली’ या म्युझिक व्हिडीओमुळे प्रकाशझोतात आली होती. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधीपासूनच पलकचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत जोडलं गेलंय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. याआधी सारा आणि इब्राहिम यांच्यासोबत पलक फिरायलाही गेली होती.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.