Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oscar 2022 Nominations :’रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन, ‘जय भीम’ आणि ‘मरक्कर’ बाहेर, पाहा संपूर्ण यादी

भारतातील 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाची 94 व्या अकॅडमी अवॉर्डस् साठी नॉमिनेशन मिळाले आहे. ही भारतासाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आहे.

Oscar 2022 Nominations :'रायटिंग विथ फायर' या भारतीय माहितीपटाला नामांकन, 'जय भीम' आणि 'मरक्कर' बाहेर, पाहा संपूर्ण यादी
oscar 2022
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 9:29 PM

मुंबईः भारतातील ‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाची 94 व्या अकॅडमी अवॉर्डस् साठी नॉमिनेशन मिळाले आहे. ही भारतासाठी (India) मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. द पावर ऑफ द गॉडला सगळ्यात जास्त कॅटेगॅरीमध्ये नॉमिनेशन (Nomination) मिळाले आहे. जगातील सगळ्यात प्रतिष्ठीत समजला जाणाऱ्या अकॅडमी (Academy) अवॉर्ड म्हणजे सगळ्या चित्रपटकर्मींसाठी ती प्रतिष्ठेची बाब असते. या वर्षीही अनेक मोठे चित्रपट या पुरस्कार सोहळ्यात विजयाचे दावेदार होते. आणि यावर्षी सगळ्यात जास्त भारतीय प्रेषकांनी या पुरस्कार सोहळ्याकडून अपेक्षा आहेत, कारण ऑस्कर पुरस्काराच्या यादीत काही भारतीय चित्रपटांनी जागा मिळवली आहे.

नॉमिनेशच्या यादीतही भारतीय चित्रपटांची नावं आहेत. यावर्षी भारतातर्फे सूर्याची जय भीम आणि मोहनलालची मराक्कर हा चित्रपटचाही समावेश होता, मात्र पुरस्कारावर याची मोहोर उमटू शकली नाही. चित्रपटाच्या या गर्दीत मात्र माहितीपटाच्या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाने सगळ्याना आश्चर्यचकित करून टाकले, कारण या माहितीपटाने आपली जागा पक्की केली आहे. 94 व्या अकॅडमी अवॉर्ड सोहळा चालू असून तो त्यांच्या यूट्यूब आणि ABC वरून सुरू आहे.

भारताकडून गेलेला माहितीपट ‘रायटिंग विथ फायर’ ला 94 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी नॉमिनेशन मिळाले आहे. ही भारतीय प्रेषकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. हा माहितीपट रिंटू थॉंमस आणि सुष्मित घोष या दोघांनी मिळून दिग्दर्शित केली आहे. याबरोबरच आणखी चार माहितीपटांची निवडही झाली आहे. ज्यामध्ये एटिकी आणि फ्ली यांचाही समावेश आहे. बेस्ट फिचर फिल्मसाठी जपान, डेनमार्क, इटली, भूतान आणि नॉर्वे देशातील चित्रपटांचा समावेश आहे.

अकॅडमीसाठी एंड्रू गारफील्ड, विल स्मिथ, बेनेडिक्ट कम्बरबॅच, डेन्जल वॉशिंग्टन आणि जेवियर बर्डेम यांचा समावेश आहे.

यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कारच्या नॉमिनेशनसाठी अभिनेत्री जेसिका चॅस्टन, ओलिविया कॉलमॅन, निकोल किडमॅन आणि पेनेलॉप क्रुज, क्रिस्टीन स्टीवर्ट या स्पर्धेत आहेत.

सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी स्टीवन स्पिलबर्ग, जॅन कॅम्पियन, पॉल थॉमस एंडरसन या सारखे दिग्गज या स्पर्धेत आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.