Oscars 2023 | आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, रस्त्यावर विकलं पनीर; ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांचा संघर्ष

'माझ्या आयुष्यातील सर्वांत सुखद क्षणी.. मग ते ऑस्कर असो किंवा 'गँग्स ऑफ वासेपूर', 'द लंचबॉक्स' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती असो, किंवा माझं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस लाँच असो.. मला माझ्या बाजूला आई-वडिलांनी राहावं, अशी मनापासून इच्छा होती.'

Oscars 2023 | आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, रस्त्यावर विकलं पनीर; ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांचा संघर्ष
कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 10:12 AM

मुंबई : भारताने 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार आपल्या नावे करत इतिहास रचला. RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यासह ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाने ऑस्कर पटकावला आहे. दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस आणि निर्मात्या गुनीत मोंगा यांना ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटासाठी गौरविण्यात आलं. ऑस्कर पटकावणाऱ्या निर्मात्या गुनीत मोंगा यांनी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच संघर्षांचा सामना केला. लहानपणी गुनीत यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. आई-वडिलांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या रस्त्यावर पनीरसुद्धा विकायच्या. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या गुनीत यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जीवनातील संघर्षांचा खुलासा केला.

‘आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न’

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, ‘आजपर्यंत मी उधारीच्या स्वप्नांवर जगले. मी दिल्लीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठे झाले. जगासाठी आम्ही खुश होतो, पण बंद दरवाजामागे काय घडलं हे कोणालाच माहीत नव्हतं. माझ्या कुटुंबाला एका मोठ्या घरातील एक खोली देण्यात आली होती. भावंडांमधील प्रॉपर्टीच्या वादामुळे माझ्या आईला नेहमीच वाईट वागणूक मिळाली. ते तिला शिवीगाळ करायचे. एके दिवशी हा वाद इतका वाढला की माझ्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी पोलिसांना बोलावलं आणि आमच्यासह ते तिथून पळाले.’

‘रस्त्यावर पनीर विकलं, मिळेल ते काम केलं’

‘आम्ही पुन्हा नव्याने आमचं आयुष्य सुरू केलं. हळूहळू माझी आई आमच्यासाठी एका घराचं स्वप्न पाहू लागली होती. ग्राऊंड फ्लोअरवर तीन बेडरूमचं घर आणि त्या घरासमोर तीन पायऱ्या.. इतकंच तिचं स्वप्न होतं. तिच्यासाठी एक तरी घर खरेदी करावं, असा निर्धार मी केला. वयाच्या 16 व्या वर्षी मी शिक्षण घेत काम करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर पनीर विकलं, पीव्हीआरमध्ये अनाऊंसर म्हणून काम केलं, डीजे आणि अँकर म्हणूनही काम केलं. कॉलेजमध्ये असताना मी मुंबईला चित्रपटात काम करण्यासाठी येऊ लागले. को-ऑर्डिनेटर ते प्रॉडक्शन मॅनेजर अशी कामं केली. मी जे काही कमवायचे, ते माझ्या आईवडिलांना घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी द्यायचे’, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

‘स्वप्न पूर्ण झालं तेव्हा आई-वडील सोडून गेले’

पुढे त्या म्हणाल्या, ‘काम करत साठवलेल्या पैशांतून आम्ही एक घर बुक केलं. पण जेव्हा स्वत:चं घर तयार झालं, तेव्हा सहा महिन्यांच्या कालावधीत मी माझ्या आई-वडिलांना गमावलं. आईला घशाचा कॅन्सर होता आणि वडिलांची किडणी निकामी झाली होती. माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी मी माझे बॅक पॅक केले, घर विकलं आणि मुंबईला निघून आली. मी स्वत:ला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं होतं. मी फक्त चारच तास झोपायचे. प्रत्येक चित्रपट हे एक आव्हान होतं. पण काम करताना मला आनंद व्हायचा. ‘तू खूप छान काम करतेयस’ किंवा ‘आम्हाला तुझा अभिमान आहे’ असं मला आई-वडिलांकडून ऐकायचं होतं. मला अजूनही आठवतंय, एकदा मला युएसएच्या स्कूल ट्रिपवर पाठवण्यासाठी वडिलांनी त्यांचा सोन्याचा कडा विकला होता. मी जग बघावं अशी त्यांची इच्छा होती.’

‘माझ्या आयुष्यातील सर्वांत सुखद क्षणी.. मग ते ऑस्कर असो किंवा ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘द लंचबॉक्स’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती असो, किंवा माझं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस लाँच असो.. मला माझ्या बाजूला आई-वडिलांनी राहावं, अशी मनापासून इच्छा होती. ते जिथे कुठे असतील तिथे खुश असतील, हे मला माहीत आहे. अखेर मी उधारीची स्वप्नं पाहणं सोडून दिली, हे पाहून त्यांनासुद्धा माझा अभिमान वाटेल’, अशा शब्दांत त्यांनी समाधान व्यक्त केलं.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...