ऑस्कर विजेता ‘पॅरासाइट’ चित्रपटातील अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; ड्रग्ज प्रकरणात होतं नाव

ली सन-क्युनचा दक्षिण कोरियातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. 'पॅरासाइट' या चित्रपटाच्या भूमिकेतून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारही जिंकला होता. कॉफी प्रिन्स, माय मिस्टर यांसारख्या ड्रामामध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.

ऑस्कर विजेता 'पॅरासाइट' चित्रपटातील अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; ड्रग्ज प्रकरणात होतं नाव
Lee Sun-KyunImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 11:21 AM

सेऊल, दक्षिण कोरिया : 27 डिसेंबर 2023 | प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या ‘पॅरासाइट’ या चित्रपटातील कोरियन अभिनेता ली सन-क्युनचा संशयास्पद मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात ली सन-क्युनचं नाव समोर आलं होतं. त्याप्रकरणी पोलिसांकडून चौकशीसुद्धा सुरू होती. यादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘कोरिया टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल सेऊलमधील एका पार्कमध्ये बंद कारच्या आत एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला होती. रुग्णालयात दाखल केलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं. या व्यक्तीची ओळख ली सन-क्युन म्हणून पटल्याची माहिती पोलिसांनी दिली. 48 वर्षीय ली सन-क्युनने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांना ली सन-क्युनच्या पत्नीचा फोन आला होता. माझ्या पतीने घरात सुसाइड नोट लिहून ठेवली आणि त्यानंतर तो घर सोडून निघून गेला. त्याची गाडीसुद्धा नसल्याची माहिती तिने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पार्कमध्ये एका कारमध्ये पोलिसांना ली सन-क्युन बेशुद्धावस्थेत आढळला. ली सन-क्युनच्या कारमध्ये जळालेल्या कोळशाच्या ब्रिकेटवरून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ड्रग्ज आणि इतर नशेच्या पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी आतापर्यंत ली सन-क्युनची तीन वेळा चौकशी झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याच्यावर ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप झाला होता. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र चौकशीदरम्यान त्याने ड्रग्ज घेतलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. “मी एका स्ट्रॉद्वारे औषध घेतलं होतं. मला वाटलं की त्या झोपेच्या गोळ्या आहेत. ते ड्रग्ज किंवा नशेचे पदार्थ असल्याची मला माहिती नव्हती”, असं तो म्हणाला होता. याप्रकरणी त्याचे काही नार्कोटिक्स टेस्ट आणि लाय डिटेक्टर टेस्टसुद्धा करण्यात आले होते. 26 डिसेंबर रोजी त्याची लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर ली सन-क्युनने माध्यमांसमोर येत चाहत्यांची माफीदेखील मागितली होती. अशा प्रकारच्या घटनेत माझं नाव समोर आल्यानंतर अनेकांची खूप निराशा झाली. त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि या काळात मला पाठिंबा दिला, त्यांच्यासमोर झुकून मी आभार मानू इच्छितो, असं तो म्हणाला होता.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....