Oscars 2023 | RRR मधील ‘नाटू नाटू’ गाण्याची ऑस्करमध्ये एण्ट्री; पहा अकॅडमी अवॉर्ड्सच्या नॉमिनेशनची संपूर्ण यादी

एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार पटकावल्यानंतर आता ऑस्करमध्ये या गाण्याला नामांकन मिळालं आहे.

Oscars 2023 | RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याची ऑस्करमध्ये एण्ट्री; पहा अकॅडमी अवॉर्ड्सच्या नॉमिनेशनची संपूर्ण यादी
Oscars 2023 | RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याची ऑस्करमध्ये एण्ट्री
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 9:46 AM

मुंबई: तब्बल 21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत प्रतिष्ठित ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात भारताच्या तीन चित्रपटांना नामांकनं मिळाली आहत. आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाला 2002 मध्ये ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. ज्यानंतर आता 95व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार पटकावल्यानंतर आता ऑस्करमध्ये या गाण्याला नामांकन मिळालं आहे.

मंगळवारी 24 जानेवारी रोजी ऑस्करच्या नामांकनांची घोषणा झाली. RRR मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात नामांकन मिळालं आहे. या विभागात एकूण पाच गाणी आहेत, त्यापैकीच एक नाटू नाटू हे गाणं आहे.

RRR शिवाय भारताकडून पाठवलेल्या ‘ऑल दॅट ब्रीद्स’ला (All That Breathes) बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म विभागात आणि ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ला (The Elephant Whisperers) बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म विभागात नामांकन मिळालं आहे. त्यामुळे भारताकडून एकूण तीन चित्रपटांना नामांकनं मिळाली आहेत.

हे सुद्धा वाचा

ऑस्कर 2023 नॉमिनेशन्सची संपूर्ण यादी

बेस्ट पिक्चर (सर्वोत्कृष्ट चित्रपट)

ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फॅबलमॅन्स, टार, वीमेन टॉकिंग, ट्रँगल ऑफ सॅडनेस

बेस्ट डायरेक्शन (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन)

मार्टिन मॅकडोना (द बँशीज ऑफ इनिशेरिन), डॅनियल क्वान आणि डॅनियल, शायनर्ट (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), स्टीवन स्पीलबर्ग (द फॅबलमॅन्स), टॉड फील्ड (टार), रबेन ओस्टलँड (ट्रँगल ऑफ सॅडनेस)

बेस्ट ॲक्ट्रेस इन अ लीडिंग रोल (मुख्य अभिनेत्री)

केट ब्लँचेट (टार), ॲना डे आर्म्स (ब्लॉन्ड), अँड्रिया राइजबोरो (टू लेजली), मिशेल विलियम्स (द फॅबलमॅन्स), मिशेल येओ (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)

बेस्ट ॲक्टर इन अ लीडिंग रोल (मुख्य अभिनेता)

ऑस्टिन बटलर (एल्विस), कॉलिन फेरेल (द बँशीज ऑफ इनिशेरिन), ब्रँडन फ्रेजर (द ह्वेल), पॉल मॅसकल (आफ्टरसन), बिल नाय (लिविंग)

बेस्ट विजुअल इफेक्ट्स

ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, टॉप गन: मॅवरिक

बेस्ट सिनेमॅटोग्राफी

ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, एल्विस, टार, अम्पायर ऑफ लाइट, बार्डे, फॉल्स क्रॉनिकल ऑफ ए हँडफुल ऑफ थ्रथ्स

बेस्ट फिल्म एडिटिंग

द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, टार, टॉप गन: मॅवरिक

बेस्ट ॲक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री)

एंजेला बेसेट (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर ), हॉन्ग चाउ (द ह्वेल), केरी कोंडोन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), जेमी ली कर्टिस (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), स्टेफनी सू (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)

बेस्ट कॉस्च्युम डिझाइन

रूथ कार्टर (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर ), मेरी जोफ्रेस (बेबीलॉन), कॅथरीन मार्टिन (एल्विस), जेनी बीवन (मिस हेरिस गोज टू पेरिस)

बेस्ट साऊंड ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, एल्विस, टॉप गन: मॅवरिक

बेस्ट ओरिजनल स्कोअर

ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, बेबीलॉन, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फॅबलमॅन्स

बेस्ट ॲडाप्टेड स्क्रीनप्ले

ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ग्लास अन्यन: अ नाइव्स आउट मिस्ट्री, लिविंग, टॉप गन: मॅवरिक, वीमेन टॉकिंग

बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वंस, द फॅबलमॅन्स, टार, ट्रँगल ऑफ सॅडनेस

बेस्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म

ॲन आयरिश गुडबाय, लवालू, ले प्युपिल्स, नाइट राइड, द रेड सूटकेस

बेस्ट ॲनिमेटिड शॉर्ट फिल्म

द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स, द फ्लाइंग सेलर, आइस मर्चेंट्स, माय इअर ऑफ डिक्स, ॲन ऑस्ट्रिच टोल्ड मी द वर्ल्ड इज फेक अँड आय थींक आय बिलिव इट

बेस्ट ॲक्टर इन सपोर्टिंग रोल (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता)

ब्रँडन ग्लीसन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), ब्रायन टीरी हेनरी (कॉजवे), जुड हर्श (द फॅबलमॅन्स), बॅरी कियोगन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), के ह्यू क्वान (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)

बेस्ट ओरिजनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं)

अप्लॉज (टेल इट लाइक अ वुमेन), होल्ड माय हँड (टॉप गन: मॅवरिक), लिफ्ट मी अप (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर), दिस इज अ लाइफ (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), नाटू नाटू (आरआरआर)

बेस्ट डाक्युमेंट्री फीचर फिल्म

ऑल दॅट ब्रीद्स, ऑल द ब्युटी अँड द ब्लडशेड, फायर ऑफ लव्ह, अ हाऊस मेड ऑफ स्प्लिंटर्स, नवल्नी

बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्म

द एलिफेंट व्हिस्परर्स, हॉलआउट, हाउ डू यू मेजर अ इअर, द मार्था मिचेल इफेक्ट, स्ट्रेंजर ॲट द गेट

बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म

ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अर्जेंटीना, 1985, क्लोज, ईयो, द क्वाइट गर्ल

बेस्ट ॲनिमेटिड फीचर फिल्म

गुइलेर्मो डेल टोरो का पिनोचियो, मार्सेल द शेल विद शूज ऑन, पुस इन बूट्स: द लास्ट विश, द सी बीस्ट, टर्निंग रेड

बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग

द बॅटमॅन, ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, एल्विस, द ह्वेल

बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन

ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, बेबीलॉन, एल्विस, द फॅबलमॅन्स

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.