प्राची आणि नागा चैतन्यची जोडी बघण्यासाठी चाहते आतुर, लवकरच या वेब सीरिजमध्ये दिसणार!

नुकताच प्राचीने नागा चैतन्यसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नागा चैतन्यसोबत प्राची देसाई आणि दिग्दर्शक विक्रम के कुमार दिसत आहेत. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना प्राची देसाईने कॅप्शनमध्ये लिहिले की, धन्यवाद...तसेच तिने हा फोटो संपूर्ण टीमला टॅग ही केला आहे. प्राची देसाई अगोदर टिव्हीमध्ये काम करत होती.

प्राची आणि नागा चैतन्यची जोडी बघण्यासाठी चाहते आतुर, लवकरच या वेब सीरिजमध्ये दिसणार!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 8:38 AM

मुंबई : साऊथचा सुपरस्टार बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपले नशीब अजमवण्यासाठी तयार आहे. नागा चैतन्य लवकर बॉलिवूडमध्ये धडाक्यात पदार्पण करणार आहे. नागा चैतन्यचे नाव साऊथच्या बड्या कलाकारांमध्ये घेतले जाते. बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर नागा चैतन्य लवकरच आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाचा (Movies) ट्रेलरही रिलीज झाला आहे. दरम्यान आता नागा चैतन्यबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नागा चैतन्य एका वेब सीरिजमध्ये काम करत आहे, ज्यामध्ये प्राची देसाई देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नागा एक धूता नावाच्या वेब सीरिजमध्ये (Web series) काम करत आहे, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाई देखील आहे.

प्राची देसाईने शेअर केला फोटो

नुकताच प्राचीने नागा चैतन्यसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नागा चैतन्यसोबत प्राची देसाई आणि दिग्दर्शक विक्रम के कुमार दिसत आहेत. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना प्राची देसाईने कॅप्शनमध्ये लिहिले की, धन्यवाद…तसेच तिने हा फोटो संपूर्ण टीमला टॅग ही केला आहे. प्राची देसाई अगोदर टिव्हीमध्ये काम करत होती. प्राचीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तिने रॉक ऑन या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. यासोबतच ती अभिनेता अजय देवगण आणि इमरान हाश्मी यांच्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटातही दिसली होती.

OTT वर धमाका करण्यासाठी सज्ज

प्राचीने आता बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केलीये. आता OTT वर धमाका करण्यासाठी प्राची तयार आहे. प्राची आणि नागाला सोबत बघण्यासाठी चाहते आतुर आहेत. मनम आणि थँक यू नंतर, नागा चैतन्य दिग्दर्शक विक्रम के कुमारसोबत तिसरा प्रोजेक्ट करत आहे. त्याशिवाय तेलुगू चित्रपट थँक यूचे शूटिंग देखील पूर्ण झाले आहे. या चित्रपटात चैतन्य राशी खन्ना आणि अविका गोरसोबत दिसणार आहे. श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्सच्या बॅनरखाली दिल राजूने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.